सांगोला शहरासह इतर ग्रामीण भागामध्ये सूर्याच्या कडक तापमानामुळे ओस पडू लागले रस्ते...!
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
कोळे प्रतिनिधि:- राज्यांमध्ये उष्णतेची लाट अधिक तीव्र झालेली दिसुन येत आहे. बहुतांश सांगोला शहरांसह इतर सर्व ग्रामीण भागांमध्ये किमान तापमान ३९° ते ४१° अंशावर उष्णेतेचा पारा गेलेला
असुन येणाऱ्या आगामी तीन दिवस अधिक तीव्र उष्ण तापमान राहण्याचे अंदाज हवामान खात्याने वर्तविला असुन तसेच दरम्यान ६ ते ९ एप्रिल दरम्यान हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
या दरम्यान सांगोला व ग्रामीण भागामध्ये तापमान उष्ण व दमट व अस्वस्थ करणारे असे वातावरण राहणार आहे.
तरी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याने दिला आहे.
सांगोला शहराबरोबरच ग्रामीण भागांमध्येही अतिउष्ण व कडक तापमानामुळे सर्व परिसरात दुपारी कडक उन्ह जाणवत आसल्यामुळे दुपारी रस्ते ओस पडले आहेत.
शेतकऱ्यांना शेतांमध्ये दुपारी शेतांमध्ये काम करणे अवघड होत आहे.पडणाऱ्या कडक उन्हामुळे या उन्हाचा त्रास लहान - मुले ज्येष्ठ, वयोवृद्ध लोकांना होत आहे.
लहान मुले, ज्येष्ठ ,वयोवृद्ध या कडक उन्हामुळे आजारी पडत आहे. रुग्णालयांत रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
उच्च तापमानामुळे उकाडा जाणवत असल्यामुळें दुपारचा वेळेत मुख्य बाजारपेठामध्ये शुकशुकाट पाहायला मिळतो.
दुपारच्या वेळेत काही लोक विहीर व कॅनॉल आदी ठिकाणी पोहणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे.
तसेच वाढत्या उन्हात तहान भागवण्यासाठी शितपिये पिणाऱ्यांची संख्या ही वाढत असल्याचे दिसून येते.


0 Comments