google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यात १३ हजार ९८० शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर बुधवारी २२ कोटी १४ लाख ७१ हजार ६४० रुपये जमा : तहसीलदार

Breaking News

सांगोला तालुक्यात १३ हजार ९८० शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर बुधवारी २२ कोटी १४ लाख ७१ हजार ६४० रुपये जमा : तहसीलदार

सांगोला तालुक्यात १३ हजार ९८० शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर बुधवारी २२ कोटी १४ लाख ७१ हजार ६४० रुपये जमा : तहसीलदार


शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२

सांगोला (प्रतिनिधी):- जून २०२३ खरीप हंगामामध्ये कमी प्रमाणात पर्जन्यमान झाल्याने नुकसान झालेल्या ४७ हजार ७७३ शेतकऱ्यांपैकी 

१३ हजार ९८० शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर बुधवार दि.३ एप्रिल रोजी २२ कोटी १४ लाख ७१ हजार ६४० रुपये जमा झाले आहेत. उर्वरित १५ हजार ४५५ शेतकऱ्यांनी

 ई - केवायसी केली नसल्यामुळे त्यांचे अनुदान प्रलंबित असून संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या बँकखात्याची केवायसी करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार संतोष कणसे यांनी केले आहे.

जून ते सप्टेंबर - ऑक्टोंबर २०२३ मध्ये अतिशय कमी प्रमाणात पर्जन्यमान झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या दुष्काळाला सामोरे जावं लागले होते. कमी पर्जन्यमान झाल्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते

 या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने १५ जिल्ह्यातील ४० तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर केला आहे. यादुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान जाहीर केले होते. 

त्यानुसार सांगोला तालुक्यातील बागायत, फळ बागायत व जिरायत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान वितरित केले जात आहे.

मागील वर्षी खरीप हंगामामध्ये कमी प्रमाणात पर्जन्यमान झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिके जाग्यावरच करपून गेली होती. 

परिणामी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीला आर्थिक मदत म्हणून शासनाकडून दुष्काळअनुदान देण्यासंदर्भात तालुकास्तरावरील महसूल प्रशासनाकडे अहवाल मागविण्यात आला होता. 

त्यानुसार सांगोला तालुक्यातील ४७ हजार ७७३ शेतकऱ्यांचे बागायत, फळबागायत व जिरायत क्षेत्राचे नुकसान झाले बाबत ७२ कोटी ३६ लाख ७३ हजार ३५३ रुपयांची मागणी शासन दरबारी करण्यात आली होती. 

त्या अनुषंगाने बागायत क्षेत्रासाठी हेक्टरी २२ हजार ५०० रुपये,बागायत १७ हजार रुपये, जिरायत ८ हजार ५०० रुपये शासनाने अनुदान जाहीर केले होते.

जून २०२३ खरीप हंगामात झालेल्या नुकसानी पोटी दुष्काळी अनुदान वितरित करण्याची प्रक्रिया सुरू असून तालुक्यातील १५ हजार ४५५ शेतकऱ्यांनी बँक

 खात्याशी ई - केवायसी करून घ्यावी आणि शासनाच्या दुष्काळी अनुदानाचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार संतोष कणसे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments