कोळा येथे सांगोला पोलिसांकडून कायदा सुव्यवस्था
अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च संपन्न...
सांगोला तालुक्यात माढा लोकसभा मतदारसंघाची आचारसंहिता लागली असल्यामुळे सांगोला पोलीस स्टेशन कडून सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे
डीवायएसपी विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक भीमराव खनदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळा परिसरात पोलिस यंत्रणादेखील सज्ज झाली आहे.
त्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गावातील बाजारपेठेतून रूट मार्च काढण्यात आला. यावेळी पोलीस बांधव कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध पक्षांकडून लोकसभा निवडणुकीचे उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे निवडणुकीची आचारसंहिता लागली असून
लोकसभा निवडणुकीत कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी व गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा, त्यादृष्टीने सांगोला पोलीस स्टेशन कडून कोळा आऊट पोस्ट पोलीस बांधवांचा हद्दीत रूट मार्च काढण्यात आला.
रूट मार्चला कोळा पोलिस आऊट पोस्ट पासून सुरुवात करून येथील एसटी स्टँड चौक अर्जुन चौक लक्ष्मी चौक महादेव मंदिर कोळेकर महाराज मठ माकु बाई मंदिर एसटी स्टँड चौकात शेवट करण्यात आला
संपूर्ण गावातून जवळपास ३०० ते ४०० पोलिसांच्या उपस्थितीत रूटमार्च संपन्न झाला पोलीस निरीक्षक भीमराव खनदाळे यांनी योग्य नियोजन केले होते.
कोळा बीटचे एपीआय आदिनाथ खरात पोलीस यांच्यासह सर्व आधिकारी कोळा बीटचे पोलीस कराडवाडी कोंबडवाडी कोळा या गावचे पोलीस पाटील उपस्थित होते
या रूट मार्चमध्ये सर्व पोलीस कर्मचारी तसेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल व होमगार्ड, दामिनी पथक, निर्भया पथक, वाहने, सीआर व्हॅन, पिटर मोबाइल आदी सहभागी झाले होते.
संपूर्ण गावाने एक वेगळा अनुभव पोलिसांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. या पोलिसांच्या रूट मार्च मुळे कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मोठी मदत होणार आहे..
0 Comments