google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 माढा मतदारसंघातील तरुणांची लग्नं करणं, हेच आपलं उद्दिष्ट असणार-रमेश बारसकर

Breaking News

माढा मतदारसंघातील तरुणांची लग्नं करणं, हेच आपलं उद्दिष्ट असणार-रमेश बारसकर

माढा मतदारसंघातील तरुणांची लग्नं करणं, हेच आपलं उद्दिष्ट असणार-रमेश बारसकर


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी):- राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार साहेब बुद्धिबळाच्या पटावरील राजे आहेत. माढा लोकसभा मतदारसंघातील सहाच्या सहा 

विधानसभा मतदारसंघ विरोधी पक्षाकडे असल्याने राजानं कधी धोका पत्करायचा नसतो. म्हणून, राजानं माढा लोकसभेला माझ्यासारख्या सोल्जरला, निवडणुकीला 

उभे राहण्यासाठी ताकद द्यायला हवी, अशी मागणी केली होती. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यावर विश्वास दाखवला.

तरुण मुलं लग्नाचं वय झालेलं असताना देखील मुलगी मिळत नाही. मतदारसंघातील तरुणांची लग्नं करणं, हेच आपलं उद्दिष्ट असणार आहे, 

हा प्रश्न माढा मतदारसंघातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातला प्रश्न आहे. या प्रश्नावर प्रामुख्याने मी काम करणार आहे, असेमत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रमेश बारसकर यांनी व्यक्त केले.

निवडणुका आल्या की राजकीय पक्षांकडून विविध घोषणांचा पाऊस पाडला जातो. आम्ही पाणी देऊ... - तरुणांच्या हाताला काम देऊ... 

महागाई कमी करू.... शेतीमालाला हमीभाव देऊ... अशा राजकीय घोषणांना ऊत येतो. मात्र, माढ्यातील वंचितचे उमेदवार रमेश बारसकर यांनी मतदारसंघातील तरुणांची

 लग्न करणं, हेच आपलं उद्दिष्ट असणार आहे, अशी अफलातून घोषणा केली आहे, त्यांच्या या घोषणेची माढा लोकसभा मतदारसंघात एकच चर्चा रंगली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रमेश बारसकर यांनी मंगळवारी सांगोल्यात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. 

यावेळी रमेश बारसकर यांनी प्रसिध्दी माध्यमांशी संवाद साधताना एका वेगळ्या मुद्याला हात घातला आहे. माढा लोकसभा मतदारसंघासह राज्यभरातील तरुणांची वेळेवर लग्न होत नाहीत. 

३० ते ३५ वर्षे उलटून गेल्यानंतरही तरुणांची लग्नं होतं नाहीत. त्यांच्या लग्नाची ही समस्या सोडविण्यासाठी आपण प्राधान्याने काम करणार आहे, अशी अफलातून घोषणा बारसकर यांनी केली. 

ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. तरुणपणी निवडणुक लढवली नाही तर काय म्हातारपणी निवडणुक लढवायची का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Post a Comment

0 Comments