google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी..जाहीर सभा धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ सांगोल्यात उद्या शरद पवारांची जाहीर सभा

Breaking News

मोठी बातमी..जाहीर सभा धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ सांगोल्यात उद्या शरद पवारांची जाहीर सभा

मोठी बातमी..जाहीर सभा  धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ सांगोल्यात उद्या शरद पवारांची जाहीर सभा


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)


सांगोला : महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची सांगोला येथे शुक्रवारी जाहीर सभा होणार आहे. 

शुक्रवारी दुपारी दोन वाजता मार्केट यार्डच्या आवारात या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर जाहीर सभेस माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील हे उपस्थित राहणार आहेत.

 सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष,काँग्रेस आय पक्षाच्या व मित्र पक्षाच्या सर्व नेतेमंडळी या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत.

 सभेसाठी कार्यकर्त्यांकडून नियोजन सुरू आहे. शरद पवार यांच्या सभेत सांगोल्यातील महविकास आघाडीचा सहयोगी असलेल्या शेतकरी कामगार पक्षावरच महाविकास आघाडीची 

सांगोला तालुक्यात भिस्त आहे. शरद पवार यांच्या लोकसभा निवडणुकीतील या सभेत ते नेमके काय? बोलणार याकडे तालुक्यांतील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

Post a Comment

0 Comments