google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग‌ न्यूज! मोदी आणि राहुल गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस

Breaking News

ब्रेकिंग‌ न्यूज! मोदी आणि राहुल गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस

ब्रेकिंग‌ न्यूज! मोदी आणि राहुल गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस


संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आता चांगलेच तापू लागले आहेत.

 विविध पक्षांकडून प्रचाराला जोर दिला जात आहे. तसेच प्रचारातील रंगत आता वाढत आहे.

 पहिल्या टप्प्याचे मतदान अलीकडेच पूर्ण झाले. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या होणार आहे. 

दरम्यान, निवडणूक आयोगाने पंतप्रधान मोदी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे.

 आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली असून, दोघांनाही 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. 

दोन्ही पक्षांनी परस्परावर धर्म, जात, समुदाय किंवा भाषेच्या आधारावर द्वेष आणि फूट निर्माण केल्याचा आरोप केला होता. 

सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांसाठी प्रचारसभांचे आयोजन केले जात असून या सभांमधून मोदींनी काँग्रसवर जोरदार टीका केली होती.

 त्यांच्या या टीकेनंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. 

तर, राहुल गांधींनीदेखील टीका करताना मोदींवर टीका केली होती. त्याविरोधात भाजपनेही आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.

 त्यानंतर अखेर दोन्ही पक्षांच्या तक्रारींची दखल घेत निवडणूक आयोगाने मोदी आणि राहुल गांधींना आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस पाठवली असून सोमवारपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.

Post a Comment

0 Comments