निरीक्षकाने परळी येथे येऊन रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या चिठ्ठीमध्ये कौटुंबिक वादाचे लिहिले कारण.
बीड: पुण्यातील सीआयडी विभागात कार्यरत असलेल्या पोलिस निरीक्षकाने परळी येथे येऊन रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली.
हा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. त्यांच्या खिशात चिठ्ठी आढळली असून त्यात कौटुंबिक वादाचे कारण लिहिले आहे.
सुभाष दुधाळ (वय ४०, रा. बीड) असे मृत पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. ते अगोदर बीडच्या सीआयडी विभागात होते. परळी ठाण्यातील आरोपीच्या कोठडीतील मृत्यूची त्यांनी चौकशी केली होती.
यामध्ये पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना बेड्या ठोकल्या होत्या. साधारण दोन महिन्यांपूर्वी त्यांची पुणे येथे बदली झाली.
शुक्रवारी ते बीडला आले होते. त्यानंतर त्यांनी परळी गाठत रेल्वेसमोर आत्महत्या केली. पत्नी शीतल यांनी पती मिसिंग असल्याची तक्रारही दिली होती.
0 Comments