google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट महायुतीकडून महादेव जानकर यांच्या पक्षाला एक जागा

Breaking News

महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट महायुतीकडून महादेव जानकर यांच्या पक्षाला एक जागा

महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट महायुतीकडून महादेव जानकर यांच्या पक्षाला एक जागा


महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट आलाय. कारण गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून छोट्या पक्षांना विचारात घेतलं जात नाही,

 अशी नाराजी दर्शवणारे रासप नेते महादेव जानकर यांनी महायुतीतच राहण्याचा निर्णय घेतला आहे.विशेष म्हणजे महादेव जानकर यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती.

 त्यामुळे महादेव जानकर महाविकास आघाडीकडून लोकसभेची निवडणूक लढतील, अशी चर्चा होती. या सर्व चर्चांनंतर आता राजकारणात ट्विस्ट आणणारी घटना घडली. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. 

तसेच अजित पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते. या बैठकीत जागावाटपाबाबत चर्चा झाली. यावेळी महादेव जानकर यांच्या पक्षाला एक जागा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. 

ही बैठक सुरु असताना सुनील तटकरे आणि महादेव जानकर वर्षा बंगल्याच्या बाहेर आले. यावेळी त्यांनी याबाबतची माहिती दिली. महादेव जानकर हे परभमी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

वर्षावरील बैठकीत नेमकी चर्चा काय?

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्याशी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री 

अजित पवार यांनी सविस्तर चर्चा केली. महादेव जानकर यांनी आपण महायुती सोबतच राहणार

 असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच देशाचा खऱ्या अर्थाने विकास

 झालाय आणि त्यांच्या नेतृत्वातच भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल, त्यामुळे आपण मोदीजी यांच्यासोबत आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीत महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला

 लोकसभेची एक जागा देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला. महायुतीचा प्रत्येक उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण पूर्ण शक्तिनिशी सोबत राहू, असंही महादेव जानकर यांनी यावेळी सांगितले.

सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले?

“राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते अध्यक्ष महादेव जानकर, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत आज बैठक पार पडली. 

या बैठकीत आम्ही सविस्तर विविध विषयांवर चर्चा केली. महादेव जानकर यांनी महायुतीच राहणार असल्याचा निर्वाळा बैठकीत दिला. 

महायुतीमार्फत लोकसभेची एक जागा रासपला देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आम्ही एक-दोन दिवसांत 

महायुतीचं जागावाटप जाहीर करु. त्यावेळी कोणत्या मतदारसंघात रासपला संधी दिली जाईल याबाबत तपशील मिळेल.

 या निर्णयामुळे महायुती अधिक बळकट होण्यास आम्हाला सहकार्य मिळेलच. राज्यभरात लोकसभा निवडणुकीत त्यांचं मोठं योगदान असेल”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केली.

“मी आधी महायुतीतच होतो. दबावतंत्राचा वापर बिलकूल नाही. मी शरद पवारांचे आभार मानतो. कोणत्या जागेवरुन लढायचं ते लवकरच जाहीर होईल”, अशी प्रतिक्रिया महादेव जानकर यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यांना दिली.

Post a Comment

0 Comments