google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शेकाप नेते डॉ.अनिकेत देशमुख यांची तहसीलदार यांचेकडे मागणी तालुक्यातील टंचाईग्रस्त गावामध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू करा - डॉ.अनिकेत देशमुख

Breaking News

शेकाप नेते डॉ.अनिकेत देशमुख यांची तहसीलदार यांचेकडे मागणी तालुक्यातील टंचाईग्रस्त गावामध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू करा - डॉ.अनिकेत देशमुख

 शेकाप नेते डॉ.अनिकेत देशमुख यांची तहसीलदार यांचेकडे मागणी



तालुक्यातील टंचाईग्रस्त गावामध्ये टँकरने  पाणीपुरवठा सुरू करा - डॉ.अनिकेत देशमुख

सांगोला (प्रतिनिधी):- (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला तालुक्यामध्ये सध्या पडलेल्या दुष्काळामुळे येथील शेतकरी खूप अडचणीत सापडलेला आहे. 

तालुक्यातील अनेक गावामध्ये पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण झाली आहे यासह सांगोला तालुक्यातील जनतेच्या विविध प्रकारच्या समस्येबाबत 

स्व.भाई. गणपतराव देशमुख यांचे नातू व शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते डॉ.अनिकेत देशमुख यांनी तहसीलदार संतोष कणसे यांना काल बुधवार दि.६ मार्च रोजी निवेदन दिले. यावेळी

तहसीलदार संतोष कणसे यांनीसर्व मागण्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करु असे आश्वासन दिले.

सांगोला तालुका हा महाराष्ट्र शासनाने दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर केला आहे.

त्यानुसार ज्या गावात पिण्याचे पाणी उपलब्ध नाही अशा सर्व गावात लवकरात लवकर टैंकरसुरु करावेत तसेच तालुक्यामध्ये जनावराची संख्या १४७००० इतकी आहे.

 त्यांच्या चाऱ्यांची सोय चारा छावणी किंवा चारा डेपो सुरु करावेत, शेतीच्या पाण्यासाठी असणाऱ्या टेम्भू योजनेचे आवर्तन सुरु करून माण नदीवरील बंधारे 

पूर्ण क्षमेतेने भरून देण्याची व्यवस्थाकरावी, महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली खरीप हंगाम २०२३ मधील दुष्काळामुळे असणारे अनुदान लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे.,

 म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरु आहे ते पाणी तालुक्याच्या शेवटच्या गाव पर्यंतचे पाझर तलाव पूर्ण क्षमतेनेभरून देणेत यावेत., चारा छावणी चे थकीत अनुदान लवकरात लवकर देणेत यावे., 

सांगोला तालुक्यामध्ये पशुधन जास्त असल्यामुळे येथील शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय हा दुग्ध व्यवसायाकडे वळले आहेत तरी संबंधीत शेतकऱ्यांना दुधाचे दर वाढवून योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करावा या मागण्या नमूद करण्यात आल्या आहेत.

सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री, महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी सोलापूर जिल्हा यांचेकडे देण्यात आल्या.

 सदर निवेदन देतेप्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी यांच्यासह विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाऊस कमी असल्यामुळे तालुक्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील टंचाईग्रस्त गावामध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरु करा. 

शेतकरी व ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित ठेवू नका. टेंभू म्हैसाळ योजनेतून सर्व बंधारे भरून मिळावेत अशी मागणी करत पाण्यासंदर्भात सध्या तालुक्यात राजकारण घडत आहे.

 पाण्यामध्ये कोणीही राजकारण न करता सर्व गावांना योग्य न्याय द्यावा, नजीकच्या काळात प्रलंबीत प्रश्नावर मार्ग नाही निघाला तर शेतकरी कामगार पक्ष रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही.

डॉ. अनिकेत देशमुख, शेकाप नेते, सांगोला

Post a Comment

0 Comments