सांगोला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह तथा टाऊन हॉल
नूतनीकरणाच्या नावाखाली अक्षरशः प्रशासन व लोकप्रतिनिधीच्या डोळ्यात धुळफेक
टाऊन हॉल नूतनीकरणाच्या नावावर शासनाला कोट्यावधी रुपयांचा चुना ; “आमदार साहेब निकृष्ट कामाचा हा घ्या पुरावा”
सांगोला : प्रतिनिधी (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३५८७८१२)
सांगोला शहर आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कोट्यावधी रुपयांचा विकास निधी आणला असल्याचा दावा आमदार शहाजीबापू पाटील करीत आहेत.
परंतु, सुरू असलेल्या विकास कामांच्या दर्जाबाबत मात्र लोकप्रतिनिधी व प्रशासन जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याने ठेकेदारांकडून
शासनाला दिवसाढवळ्यात चुना लावण्याचा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. सांगोला नगरपालिकेच्या मालकीचे असलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह तथा टाऊन हॉल
नूतनीकरणाच्या नावाखाली अक्षरशः प्रशासन व लोकप्रतिनिधीच्या डोळ्यात धुळफेक करून ठेकेदारांनी शासनाला कोट्यावधी रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
टाऊन हॉलच्या नूतनीकरणानंतर उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या या सभागृहात नुकताच सामाजिक संस्थेचा एक कार्यक्रम संपन्न झाला. पहिल्याच कार्यक्रमात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहात
नूतनीकरणानंतर बसविण्यात आलेल्या तब्बल 20 टक्के होऊन अधिक खुर्च्या मोडून पडल्याचे धक्कादायक चित्र समोर आले. शिवाय नूतनीकरणाच्या नावाखाली
सभागृहातपी ओ पी च्या नावाखाली अत्यंत निकृष्ट दर्जाचे कापड बसविण्यात आले आहे तसेच सभागृहाच्या फुटलेल्या काचा देखील बदलण्यात आलेल्या नाहीत सभागृहाच्या स्टेजची कोणतीही दुरुस्ती करण्यात आली नाही
तसेच सभागृहात असणारे साऊंड सिस्टमही अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचे चर्चा सांगोला शहर परिसरात रंगू लागली आहे. या अत्यंत गंभीर प्रकरणाकडे सांगोला तालुक्याचे लोकप्रतिनिधी व शहराचे प्रशासकीय अधिकारी यांनी वेळेत लक्ष देणे
गरजेचे असल्याचेही नागरिकांतून बोलले जात आहे. नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत असलेला टाऊन हॉल तब्बल वर्षभर बंद अवस्थेत होता. ठेकेदाराच्या दृष्टीने कागदोपत्री काम पूर्ण झाल्याने
उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या टाऊन हॉलमध्ये लोकसभा निवडणुक तसेच विधानसभा आणि नगरपालिका निवडणुक डोळ्यासमोर ठेवून अनेक प्रशासकीय आणि राजकीय कार्यक्रम होणार आहेत
अशावेळी नूतनीकरणाच्या नावाखाली अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने कोट्यावधी रुपयांचा चुराडा होऊनही पुन्हा एकदा सांगोला तालुका व शहरवासीयांना गैरसोयींचा सामना करावा लागणार आहे
१) बिल मिळाले म्हणून ठेकेदाराने लावले स्वच्छतागृहाला कुलूप
अत्यंत निकृष्ट काम करून कागदपत्रे टाऊन हॉलचे नूतनीकरण केलेल्या ठेकेदारांनी आपण केलेल्या कामाची बिल मिळाले नाही म्हणून टाऊन हॉलमध्ये असलेल्या स्वच्छतागृहाला कुलूप लावले आहे.
विशेष म्हणजे जोपर्यंत आपल्या कामाचे बिल मिळत नाही तोपर्यंत हे स्वच्छतागृह आपण कोणालाही वापरू देणार नाही अशी ठेकेदारांनी भूमिका घेतली असल्याचेही आता समोर येऊ लागले आहे.
२) बापू टाऊन हॉल काय ओक्के नाही राव…!!
कोट्यावधी रुपये खर्चूनही पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह तथा टाऊन हॉलचे नूतनीकरण करण्यात आले आहे.
टाऊन हॉलच्या उद्घाटनाचा नियोजित कार्यक्रम काम अपूर्ण असल्याने पुढे ढकलण्यात आला असून हे उद्घाटन ११ मार्च रोजी होणार आहे.
नूतनीकरणाच्या नावावर ठेकेदाराने फक्त निधी लाटण्याचे काम केल्यामुळे “सगळं कसं एकदम ओक्के आहे” असे म्हणणाऱ्या आमदार शहाजीबापूंना शहरातील जनता “बापू टाऊन हॉल काय ओक्के नाही राव” असेच म्हणू लागली आहे.
0 Comments