google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 उदनवाडी गावच्या सरपंच .. उपसरपंच पदी शेकापचे सौ.वलेकर व भाई.आलदर

Breaking News

उदनवाडी गावच्या सरपंच .. उपसरपंच पदी शेकापचे सौ.वलेकर व भाई.आलदर

उदनवाडी गावच्या सरपंच .. उपसरपंच पदी शेकापचे सौ.वलेकर व भाई.आलदर


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

उदनवाडी गावच्या सरपंच पदी शेतकरी कामगार पक्षाच्या सौ.विद्यादेवी संजय वलेकर यांची तर उपसरपंचपदी श्री बाळासाहेब विलास आलदर यांची बिनविरोध निवड करण्यात आली..

  उदनवाडी ग्रामपंचायती मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे तेरा  सदस्य असुन सरपंच पद हे महिलेसाठी राखीव असल्याने व पाच वर्षांत पाच महिलांना संधी देण्याचे ठरल्याप्रमाणे.. विद्यमान सरपंच सौ.कुसुम अशोक वलेकर व‌

 उपसरपंच श्री लक्ष्मण मारकड यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षाने सांगितल्या प्रमाणे शब्द पाळला गेला ..व सदर जागेवरती सौ.वलेकर व‌ श्री आलदर यांची बिनविरोध निवड करण्यात आली..

  उदनवाडी गाव हे आजतागायत स्व गणपतरावजी देशमुख ऊर्फ आबासाहेब यांच्या वर नितांत निष्ठा व श्रध्दा बाळगणारे गाव आहे.

पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ भाई बाबासाहेब देशमुख‌ यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच व उपसरपंच यांची निवड संपन्न झाली.

येणाऱ्या काळात गावचा विकास करण्यासाठी म्हणून डॉ भाई बाबासाहेब देशमुख‌ यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे नुतन सरपंच व उपसरपंच यांनी सांगितले 

सदर निवडीप्रसंगी मावळते सरपंच उपसरपंच व ग्रा.पं.सदस्य उपस्थित होते.

सदर निवड बिनविरोध पार‌ पाडण्यासाठी उदनवाडी गावातील शेतकरी कामगार पक्षाचे पंचायत समिती आजी माजी सदस्य, आजी माजी सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य,विकास सोसायटीचे

 आजी  माजी चेअरमन व्हा चेअरमन व सदस्य चिटणीस भाई दादासाहेब बाबर तसेच शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते पुरोगामी युवक संघटनेचे युवा कार्यकर्ते यांनी परीक्षम घेतले

सदर निवडणूक पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बराडे मॅडम व ग्रामसेवक जयवंत लवटे यांनी काम पाहिले.सदर निवडीनंतर डॉ भाई बाबासाहेब देशमुख‌ यांच्या शुभहस्ते सरपंच उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला

Post a Comment

0 Comments