आदर्श पर्यवेक्षिका सौ.सुरेखा मदने यांना अंगणवाडी सेविका पुरस्कार यांना प्रदान करण्यात आला...
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
कोळे प्रतिनीधी:- सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाकडून सन २०२१-२२ रोजी गुरुवार दि.७ मार्च २०२४
सकाळी ११ वा. जुळे सोलापूर जामखुंडी मंगल कार्यालय या ठिकाणी सद्या पंढरपूर पंचायत समिती येथे अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदावर काम कार्यरत
असणाऱ्या व पंढरपूर शेशन कोर्ट चे ज्येष्ठ विधीज्ञ वकिल पांडुरंग हातेकर यांच्या पत्नी सौ.सुरेखा मदने यांना आदर्श पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका पुरस्कारा प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार देते वेळी
जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनरकर, सुधीर ठोंबरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील सोलापूर जिल्हा महिला व बाल कल्याण जिल्हा कार्यक्रम अधिकारी आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
हा सदरचा सोलापूर जिल्हा परिषदेकडू दिला जाणारा सर्वश्रेष्ठ पुरस्कार मिळाल्यामुळे सौ.सुरेखा मदने यांच्यावर कौतुकाचा व अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
0 Comments