google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक.. केंद्रीय निवडणूक आयुक्तांचा तडकाफडकी राजीनामा तीन वर्षे आधीच राजीनामा दिल्याने खळबळ

Breaking News

खळबळजनक.. केंद्रीय निवडणूक आयुक्तांचा तडकाफडकी राजीनामा तीन वर्षे आधीच राजीनामा दिल्याने खळबळ

खळबळजनक.. केंद्रीय निवडणूक आयुक्तांचा तडकाफडकी राजीनामा


तीन वर्षे आधीच राजीनामा दिल्याने खळबळ

एकीकडे लोकसभेच्या तारखा कधीही जाहीर होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता असताना एक मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त अरुण गोयल  यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही तो मंजूर केला. तीन सदस्य असलेल्या निवडणूक आयोगामध्ये या आधीच एका आयुक्ताचे पद रिक्त होतं.

 आता अरुण गोयल यांच्या राजीनाम्यानंतर केवळ मुख्य निवडणूक आयुक्तच आयोगामध्ये शिल्लक राहिले आहेत. विशेष म्हणजे अरुण गोयल यांनी कार्यकाल संपण्याच्या तीन वर्षे आधीच राजीनामा दिल्याने त्याची चर्चा सुरू आहे.

अरुण गोयल यांची 21 नोव्हेंबर 2022 रोजी निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी यापूर्वी भारत सरकारमध्ये अवजड उद्योग मंत्रालयाचे सचिव म्हणून काम केले आहे. 

विशेष म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगात आधीच निवडणूक आयुक्ताचं एक पद खाली होतं. 

त्यानंतर आता अरुण गोयल यांनी राजीनामा दिल्याने आता निवडणूक आयोगात महत्त्वाच्या पदावर केवळ मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे आहेत. 

केंद्रीय निवडणूक आयोगात मुख्य निवडणूक आयुक्तांसोबत दोन निवडणूक आयुक्त हे देखील प्रमुख पदं असतात. 

दोन्ही निवडणूक आयुक्तांनी राजीनामा दिल्याने आता मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या खांद्यावर देशातील सर्वात मोठ्या लोकसभा निवडणुकीची जबाबदारी असणार आहे.

Post a Comment

0 Comments