google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक घटना..सांगोला तालुक्यातील धायटी येथील द्वारकाबाई माने यांचा जमिनीच्या वादातून खून?

Breaking News

धक्कादायक घटना..सांगोला तालुक्यातील धायटी येथील द्वारकाबाई माने यांचा जमिनीच्या वादातून खून?

धक्कादायक घटना..सांगोला तालुक्यातील


धायटी येथील द्वारकाबाई माने यांचा जमिनीच्या वादातून खून?

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला:- धायटी (ता. सांगोला) येथील द्वारकाबाई बबन माने (वय ६५) यांचा शिरभावी येथील फॉरेस्टमध्ये खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. द्वारकाबाई यांच्या सासर व माहेरच्या चौघा जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, द्वारकाबाई माने या धायटी येथील रहिवासी आहेत. त्यांचा मृतदेह शिरभावी येथील फॉरेस्ट मध्ये आढळून आला होता. त्यांच्या चेहऱ्यावर, डोक्यावर दगडाने वार केल्याचे खुना स्पष्टपणे दिसत होत्या. 

यावरून त्यांचा दगडाने ठेचून खून झाल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध झाले आहे. त्यांचे माहेर शिरभावी आहे. द्वारकाबाई यांचे भाऊ व त्यांच्या मुलाबरोबर जमिनीवरून वाद होत होता, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.

यावरून भाऊ आणि दोन मुलांना सांगोला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. तर त्यांचा एक भाऊ पहाटेपासून फरार झाला आहे. त्यामुळे संशय वाढला आहे.

 जमिनीच्या वादातूनच हा खून झाल्याचा संशय बळावत असून जवळच्या नातेवाईकांनीच हा खून केल्याचे निष्पन्न होईल, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे.

Post a Comment

0 Comments