विकृती! शेतजमीन नावावर कर म्हणत, बापाला कोयत्याने मारहाण; मुलावर गुन्हा दाखल सांगोला तालुक्यातील घटना....
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
शेतजमीन माझ्या नावावर कर नाहीतर ५ लाख रुपये दे, असे म्हणत मुलाने स्वतःच्या बापाला शिवीगाळ करून कोयता डोक्यात मारला.
ही घटना ११ मार्च रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मेडशिंगी (ता.सांगोला) येथे घडली असून मधुकर मारूती ननवरे यांनी मुलगा योगेश मधुकर ननवरे याचे विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतचे वृत्त असे, फिर्यादी मधुकर ननवरे, पत्नी शांता, मुलगा योगेश असे सर्वजण एकत्र राहण्यास असून शेती करून आम्ही आमचे कुंटुबांची उपजिवीका करतात. मुलगा योगेश मधुकर ननवरे हा फिर्यादी (वडील) यांचे सोबत व आई सोबत नेहमी शेत माझे नावावर कर म्हणून वाद घालत असतो.
११ मार्च रोजी सकाळी १० वा. चे सुमारास फिर्यादी घराजवळ असताना मुलगा योगेश मधुकर ननवरे हा त्यांचे आला. यावेळी त्याने तुम्ही शेत माझ्या नावावर करा नाहीतर मला पाच लाख रूपये द्या म्हणून शिवीगाळ दमदाटी करून लागला.
यावेळी फिर्यादी वडिलांनी त्याला जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शेत तुझ्या नावावर करत नाही असे सांगितले. यावर त्याने तेथेच रानात असलेला कोयता घेऊन वडिलांच्या डोक्यात मारून मला जखमी केले
व आई शांता ही सोडवण्यास आली असता तिलाही हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. याबाबत वडिलांनी मुलाच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
0 Comments