google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ध्येय प्राप्तीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न हाच यशाचा मार्ग :-प्रतिभा लिगाडे शिंदे विद्यालयात सावित्रीबाई फुले, वामनराव शिंदे साहेब स्मृतिदिन साजरा.

Breaking News

ध्येय प्राप्तीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न हाच यशाचा मार्ग :-प्रतिभा लिगाडे शिंदे विद्यालयात सावित्रीबाई फुले, वामनराव शिंदे साहेब स्मृतिदिन साजरा.

ध्येय प्राप्तीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न हाच यशाचा मार्ग :-प्रतिभा लिगाडे


शिंदे विद्यालयात सावित्रीबाई फुले, वामनराव शिंदे साहेब स्मृतिदिन साजरा.

सांगोला (प्रतिनिधी) शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

शालेय शिक्षणात उच्च ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न हाच यशाचा राजमार्ग असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापिका प्रतिभा लिगाडे यांनी केले. 

सावित्रीबाई फुले व शिंदे साहेब यांचे समाजकार्य महान असल्याचे गौरवउद्गार व्यक्त केले . विद्यार्थ्यांनी कायम या समाजसुधारक महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण करावे.

शिंदे आदर्श विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व संस्थापक वामनराव शिंदे साहेब यांच्या 31 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. 

कार्यक्रमाचे सुरुवातीस सावित्रीबाई फुले व वामनराव शिंदे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थाध्यक्षा श्रीमती कौशल्यादेवी शिंदे मॅडम ,प्रमुख पाहुणे मुख्याध्यापिका प्रतिभा लिगाडे , 

अजिंक्य उद्योग समूहाचे चेअरमन गिरीशभाऊ नष्टे ,संस्थेचे सचिव नीलकंठ शिंदे सर ,सहसचिव विठ्ठलपंत शिंदे सर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

यावेळी सुवर्णा इंगवले मॅडम ,गिरीशभाऊ नष्टे, मुख्याध्यापक रमेश पवार सर यांनी संस्थापक कै. वामनराव शिंदे साहेब यांचा त्या काळातील दूरदृष्टीकोन आपल्या मनोगतातून सांगितला, साहेबांच्या सहवासातील स्मरणीय अनेक आठवणींना या मान्यवरांनी उजाळा देऊन आदरांजली अर्पण केली.

संस्थापक वामनराव शिंदे साहेब यांच्या 31 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त प्रशालेत घेण्यात आलेल्या विविध आंतरशालेय स्पर्धांचे प्रशस्तीपत्रक वितरण प्रमुख पाहुण्यांचे हस्ते विद्यार्थ्यांना देण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुवर्णा इंगवले मॅडम  तर आभार प्रदर्शन अर्चना गोडसे मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशालेतील सर्व शिक्षक ,शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments