google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील महूद गावात शक्तिशाली स्फोट ; एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी.

Breaking News

सांगोला तालुक्यातील महूद गावात शक्तिशाली स्फोट ; एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी.

 सांगोला तालुक्यातील महूद गावात शक्तिशाली स्फोट ;


एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी.



सांगोल्यातील महूदमध्ये पहाटे गुढ स्फोट; एकाचा मृत्यु, घातपाताचा संशय

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला :- शुक्रवारी पहाटे सांगोला तालुक्यातील महूद येथे एका इमारतीला आग लागली आणि त्यानंतर मोठा स्फोट झाल्याने इमारतीचे फार मोठे नुकसान झाले .

 या स्फोटात अतुल बाड या तरुणाचा मृत्यू झाला असून दीपक कुटे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे . 

स्फोट इतका भयानक होता कि इमारतीचे शटर , पत्रे उडून दूरवर पडल्याचे चित्र होते. स्फ़ोटाची तीव्रता एवढी मोठी होती की एक किलोमीटर परिसर या स्फ़ोटा मुळे हादरून गेल्याची माहिती आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे टायरचे दुकान होते आणि पहाटे दोनच्या सुमारास या इमारतीला आग लागल्यावर स्फोट झाल्याचे सांगण्यात आले . 

हा स्फोट गॅस सिलेंडरचा असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त झाला असला तरी अजून तपास आणि पंचनामे सुरु असल्याने स्फोटाचे नेमके कारण जखमींची चौकशी केल्यावर समोर येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले . 

मात्र एवढी तीव्रता असणारा स्फोट गावाच्या मध्यवर्ती असणाऱ्या ठिकाणी झाल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे . या स्फोटात एकाला प्राण गमवावा लागला असून एक गंभीर जखमी आहे . या बाबत तर्क वितर्क लढवले जात आहे.

Post a Comment

0 Comments