google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी...माकप आमदार विनोद निकोले यांच्या द्वारे उदनवाडी च्या रस्त्याचा प्रश्न विधानसभेत ; गावकऱ्यांनी स्वीय सहाय्यक मुलाणी यांचे मानले आभार

Breaking News

मोठी बातमी...माकप आमदार विनोद निकोले यांच्या द्वारे उदनवाडी च्या रस्त्याचा प्रश्न विधानसभेत ; गावकऱ्यांनी स्वीय सहाय्यक मुलाणी यांचे मानले आभार

मोठी बातमी...माकप आमदार विनोद निकोले यांच्या द्वारे उदनवाडी च्या रस्त्याचा प्रश्न विधानसभेत ;


गावकऱ्यांनी स्वीय सहाय्यक मुलाणी यांचे मानले आभार

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला. (प्रतिनिधी) – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 128 डहाणू (अ. ज.) विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांचे विधिमंडळ कार्यालय प्रमुख तथा स्वीय सहाय्यक शाहरुख मुलाणी यांनी आपल्या गावातील विविध समस्या, प्रश्न 

आमदार निकोले यांच्याकडे मांडला असता त्यांनी उदनवाडी ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याचे विषयी अतारांकित प्रश्न सभागृहात मांडला असून त्यावर उत्तर देखील प्राप्त झाले आहे.

यावेळी आमदार निकोले म्हणाले की, मौजे उदनवाडी (ता. सांगोला, जि. सोलापूर) गावातील महामार्गापासून ते दादासाहेब जगताप हायस्कूल, 

बाजार पटांगण ते महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय, मायाक्का मंदिर ते डोंगरे डॉक्टरांचा दवाखाना, 

बाजार पटांगण ते राजाराम वलेकर सर याच्या घरापर्यंत तसेच बाजार पटांगण ते शेख पिठाची चक्की पर्यंत येणारा रस्ता अशा मुख्य रस्त्यांना मोठे खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था

 झाल्याने ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. अद्याप शासनाकडून कोणतीच कार्यवाही होत नसल्याने दिवसेंदिवस उक्त रस्त्यांची दुरवस्था होत आहे. उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे 

काय त्यानुसार सदर रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे असा प्रश्न माकप आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी विचाराला होता.

त्यावर महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तरामध्ये म्हणाले की, महामार्ग ते दादासाहेब जगताप हायस्कुल हा रस्ता एकूण 1 किमी लांबीचा ग्रामीण मार्ग दर्जाचा आहे. 

त्यापैकी 415.00 मी. लांबीची देखभाल दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असून उर्वरीत 585.00 मी. लांबी जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात आहे. 

त्यानुसार सन 2023 - 24 मध्ये निधी उपलब्धतेनुसार रस्ते दुरुस्ती शक्य आहे. मायाक्का मंदिर ते डोंगरे डॉक्टरांचा दवाखाना हा रस्ता प्रमुख जिल्हा मार्गाचा भाग असून 

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रात आहे. उर्वरीत 3 रस्ते ग्रामपंचायत उदनवाडी कार्यक्षेत्रात असून बाजार पटांगण ते महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय रस्ता दुरुस्ती पूर्ण होऊन रस्ता सुस्थितीत आहे. 

तसेच, बाजार पटांगण ते राजाराम वलेकर सर यांच्या घरापर्यंतचा रस्ता व बाजार पटांगण ते शेख पिठाची चक्की पर्यंत रस्ता ग्रामपंचायत उदनवाडी यांच्याकडील अनुदान उपलब्धतेनुसार करणे शक्य आहे, असे महाजन म्हणाले.

शेकाप माजी आमदार स्व. भाईगणपतराव देशमुख यांच्या विचारधाराप्रमाणे माकप आमदार कॉम्रेड विनोद निकोले हे देखील आहेत. त्यांनी आमच्या गावाचा प्रश्न सभागृहात मांडला त्याबद्दल आभार – गावातील नागरिक

Post a Comment

0 Comments