सांगोला आठवडा बाजार भाजी मंडई येथे मोकाट जनावरांसाठी पाणपोई सुरू रिपब्लिकन पँथर ऑफ इंडिया या संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष व नगरसेवक सुरजदादा बनसोडे यांच्या वतीने
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला:- आज 20 मार्च रोजी मानवतेचे पुजारी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह करून तेथील पाण्यावर अस्पृश्य समाजाचा हक्क सांगितला
निसर्गनिर्मित सर्वच घटकावर सर्व मानवाचा अधिकार आहे हे जातीवनद्यांना ठणकावून सांगितले , म्हणून आज त्याच दिवसाचे औचित्य साधून सांगोला आठवडा बाजार भाजी मंडई येथे
रिपब्लिकन पँथर ऑफ इंडिया या संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष व नगरसेवक सुरजदादा बनसोडे यांच्या वतीने मोकाट जनावरांसाठी पाणपोई सुरू करण्यात असली कडक्याचा उन्हाळा असून
सांगोला तालुक्यात काही गावात लोकप्रतिनिधींच्या चुकीच्या धोरणामुळे व कामकरण्याच्या पद्धतीमुळे माणसांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी करावी लागते
ही तालुक्याची शोकांतिका आहे मग अशा परिस्थितीत मुक्या जनावरांची काय अवस्था असेल हे लक्षात घेऊन नगरसेवक व अध्यक्ष सुरजदादा यांनी मोकाट जनावरांसाठी
आजच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह दिवसाचे औचित्य साधून पाणपोई ची सुरुवात व उदघाटन केले। या वेळी होलार समाजाचे नेते शिवाजी जावीर, राजाभाऊ गुळीग, लकी कांबळे, हानी कांबळे, गुणवंत जगधने ,
नरेश बनसोडे, पप्पू उर्फ प्रकाश ऐवळे जयंती उत्सव मंडळाचे खजिनदार आबासाहेब बनसोडे , गणेश सुर्वे सिराज शेख ( माखन ) आदी कार्यकर्ते , पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होतो
0 Comments