धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडून जवळा येथील पाटीलवाड्यात
स्व आमदार काकासाहेब साळुंखे पाटील व ह.भ.प. स्व. शारदादेवी (काकी) साळुंखे पाटील यांना अभिवादन -
सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर असलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी बुधवार दि २० मार्च रोजी जवळा ता सांगोला येथील
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या निवासस्थानी (पाटील वाड्याला) भेट दिली.
यावेळी त्यांनी दिपकआबांचे वडील स्व. आमदार काकासाहेब साळुंखे पाटील व दिवंगत मातोश्री ह.भ. प.
स्व शारदादेवी (काकी) साळुंखे पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी मा.सौ.रूपमती दिपकराव साळुंखे पाटील
यांच्यासह माजी उपसरपंच बाळासाहेब इमडे ,उपसरपंच नवाज खलिफा,अनिल सुतार, प्रशांत साळुंखे पाटील,मनोज धुमाळ,प्रशांत पाटील,संजय पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
अकलूजचे मोहिते पाटील आणि जवळा येथील साळुंखे पाटील परिवाराचे गेल्या अनेक पिढ्यांपासून अतूट संबंध आहेत. गेल्या काही वर्षांपासून मोहिते पाटील व साळुंखे पाटील
परिवाराच्या राजकीय भूमिका वेगळ्या असल्या तरीही दोन्ही कुटुंबाने परस्परातील ऋणानुबंध मात्र कायम जपले आहेत.
धैर्यशील मोहिते पाटील यांनी या भेटीवेळी दोन्ही परिवाराचे राजकारणाच्या पलीकडील ऋणानुबंध असल्याचे सांगितले. सध्या मोहिते पाटील आणि साळुंखे पाटील
या दोन्ही परिवाराच्या राजकीय भूमिका वेगळ्या असल्या तरीही दोन परिवार नेहमीच एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी असतात असेही यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी आवर्जून नमूद केले.
0 Comments