google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी.. उमेदवारांनो! नेत्यांसोबत राहणार फक्त ‘इतक्या’ वाहनांचा ताफा; जिल्हाधिकारी आशीर्वाद : आदर्श आचारसंहितेच्या पालनासाठी नियम

Breaking News

मोठी बातमी.. उमेदवारांनो! नेत्यांसोबत राहणार फक्त ‘इतक्या’ वाहनांचा ताफा; जिल्हाधिकारी आशीर्वाद : आदर्श आचारसंहितेच्या पालनासाठी नियम

मोठी बातमी.. उमेदवारांनो! नेत्यांसोबत राहणार फक्त ‘इतक्या’ वाहनांचा ताफा; जिल्हाधिकारी आशीर्वाद : आदर्श आचारसंहितेच्या पालनासाठी नियम



कोणत्याही राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी वाहनाच्या ताफ्यात सलग १० पेक्षा अधिक मोटार गाड्या व वाहने वापरण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यातील संपूर्ण कार्यक्षेत्रात आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये तसेच आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी

प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ मधील तरतुदीनुसार निर्बंध लागू केले आहेत.

सोलापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून कोणत्याही निवडणुकीच्या प्रचारासाठी झेंड्याच्या काठ्या उभारणे,

कापडी फलक लावणे, भित्तीपत्रक लावणे, घोषणा लिहिणे, इत्यादी करीता कोणत्याही खासगी व्यक्तीच्या जागा, इमारत, भिंत इत्यादीचा संबंधित जागा 

मालकाचे परवानगीशिवाय व संबंधित परवाना देणाऱ्या स्थानिक प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय वापर करण्यास निर्बंध राहतील.

तसेच जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणीक संस्थाच्या जागेमध्ये, परिसरात लगत जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध राहतील.

सदरचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निर्गमित केले आहेत.

Post a Comment

0 Comments