सांगोला तालुक्यात ८१ वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरचे प्रस्ताव १७,८९० नागरिकांची तहान मंजुरी मिळताच पाणीपुरवठा होणार
सांगोला : दिवसेंदिवस उन्हाची दाहकता वाढल्याने व भूगर्भातील पातळी खोलवर चालल्यामुळे सांगोला तालुक्यातील १० गावांतर्गत ८१ वाड्यावस्त्यावर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. १७,८९० नागरिकांची तहान भागविण्यासाठी
टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी संबंधित ग्रामपंचायतीकडून ठरावाद्वारे ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व सांगोला तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
यंदा सांगोला तालुक्यात सरासरी पर्जन्यमानापेक्षा कमी पाऊस झाल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर चालली आहे. गाव वाड्यावर नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी टंचाईला तोंड देत आहेत.
त्यामुळे टंचाईग्रस्त चिकमहूद गावठाणासह ७ वाडीवस्तीवरील ५ हजार लोकसंख्येला ८ खेपा, यलमार मंगेवाडीसह ११ वाडी वस्तीवरील २०३० लोकसंख्येला ३ खेपा, डोंगरगाव अंतर्गत
७ वाडी वस्तीवरील ५७७ लोकसंख्येला १ खेप, लक्ष्मीनगर अंतर्गत १० वाडी वस्तीवरील १८१० लोकसंख्येला २.५ खेपा, आचकदाणी अंतर्गत ५ वाडीवस्तीवरील १२७५ लोकसंख्येला
२खेपा, सोनलवाडी अंतर्गत ५ वाडी वस्तीवरील १३२० लोकसंख्येला २ खेपा, अजनाळे अंतर्गत ५ वाडी वस्तीवरील १४८५ लोकसंख्येला २ खेपा, लोटेवाडी अंतर्गत १३ वाडी वस्तीवरील ११८० लोकसंख्येला
२ खेपा, कटफळ अंतर्गत ९ वाडी वस्तीवरील १८२५ लोकसंख्येला ३ खेपा व बागलवाडी अंतर्गत ९ वाडी वस्तीवरील १३८७ लोकसंख्येला - खेपा अशा एकूण ८१ वाड्या वस्तीवरील १७, ८९० लोकसंख्येला
प्रति माणसी २० लिटरप्रमाणे टँकरद्वारे ३० खेपा करून पिण्याचा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी १० ग्रामपंचायतीकडून तहसीलदार व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे ठरावाद्वारे केली आहे.
चौकट -
उन्हाळ्यामुळे लोटेवाडी, बागलवाडी, सोनलवाडी, चिकमहूद आचकदाणी व यलमर मंगेवाडी यांच्याकडून टैंकर मागणीचे सहा प्रस्ताव मंजुरीसाठी मंगळवेढ प्रांत अधिकारी यांच्याकडे पाठवले आहेत.
मंजुरी मिळताच संबंधित गाव, वाडी वस्तीवर टँकरने पाणीपुरवठा सुरू करू. -संतोष कणसे, तहसीलदार, सांगोला
चौकट -
दोन महिने पुरेल इतकेच इसबावी बंधाऱ्यात पाणी तसेच शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतून २७ गावांतील दीड लाख लोकसंख्येला ग्रामपंचायतीकडून सुरू असून नव्याने १७ ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे.
त्याचबरोबर शिरभावी योजनेतून औद्योगिक वसाहत सांगोला व मेथवडे येथील सह्याद्री फार्मसी कॉलेजलाही पाणीपुरवठा सुरू आहे. पुढील दोन महिने पुरेल इतके इसबावी (पंढरपूर) येथील बंधाऱ्यात पाणी उपलब्ध आहे.
0 Comments