google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक..सांगोला तालुक्यात क्रेनची बकेट कोसळल्याने घेरडी येथे एकाचा दुर्दैवी अंत

Breaking News

धक्कादायक..सांगोला तालुक्यात क्रेनची बकेट कोसळल्याने घेरडी येथे एकाचा दुर्दैवी अंत

धक्कादायक..सांगोला तालुक्यात क्रेनची बकेट कोसळल्याने घेरडी येथे एकाचा दुर्दैवी अंत


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी) :- विहिर खोदण्यासाठी आणलेल्या क्रेनचे बकेट मधुन विहिरीतून वर येत असताना अचानकपणे क्रेनचा गिअर तुटल्याने क्रेनची बकेट कोसळल्याने एकाचा दुर्दैवी अंत झाला असल्याची घटना

 घेरडी ता. सांगोला येथे २७ मार्च रोजी दुपारी ३ वाजणेच्या सुमारास घडली. आबा गेजगे असे मृत्यू पावलेल्या इसमाचे नाव आहे. घटनेची फिर्याद शिवाजी जावीर यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २७ मार्च २०२४ रोजी ३ वा. च्या सुमारास घेरडी येथे शेतात विहिर पाडण्याचे खोदकाम चालु होते.

 यावेळी फिर्यादी यांचे मामा आबा गेजगे व नामदेव बुरंगले हे विहिर खोदण्यासाठी आणलेल्या क्रेनचे बकेट मधुन विहिरीतून वर येत होते.

 यादरम्यान अचानक पणे क्रेनचा गिअर तुटल्याने क्रेनची बकेट ही विहिरीमध्ये खाली जावुन जमिनीवर आदळली. त्यामुळे आबा गेजगे यांच्या दोन्ही पायाच्या टाचेला व मणक्याला मार लागल्याने

 फिर्यादी व विनोद गेजगे, मधुकर पोळ यांनी जखमी आबा गेजगे यांना सांगोला येथील एका खाजगी हॉस्पीटलमध्ये घेवुन आले. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी एमआरआयची टेस्ट करण्याकरीता 

सांगितल्याने त्यांना वाढेगाव नाका येथील एमआरआय लॅब येथे घेवुन गेले असता त्या ठिकाणी अचानक आबा गेजगे याचे बोलणे बंद झाले व त्याच्या हालचाली बंद झाल्या त्यावेळी आम्ही

 आबा हरिबा गेजगे यास ग्रामीण रुग्णालय सांगोला येथे घेवुन गेलो असता तेथील डॉक्टरांनी त्यास चेक केले असता आबा गेजगे हे मयत झाले असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments