google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये कता प्रकारात शिवांश होनराव तर कुमिते प्रकारात राजनंदिनी वाघचे यश

Breaking News

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये कता प्रकारात शिवांश होनराव तर कुमिते प्रकारात राजनंदिनी वाघचे यश

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये कता प्रकारात शिवांश होनराव तर कुमिते प्रकारात राजनंदिनी वाघचे यश



(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

 सांगोला येथे राज्यस्तरीय कराटे स्पर्धा संपन्न शोतोकॉन स्पोर्ट्स कराटे डेव्हलपमेंट असोसिएशन व शाओलीयन वर्ल्ड मार्शल आर्ट इंडिया यांच्या 

संयुक्त विद्यमाने अहिल्यादेवी होळकर सभागृह टाऊन हॉल सांगोला येथे दि. 24 मार्च 2024 रोजी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेला उद्घाटक म्हणून 

विद्या मंदिर प्रशालेच्या जुनियरअर कॉलेजच्या उपप्राचार्य सय्यद मॅडम व वाघमारे सरांच्या कराटे क्लासचे माजी विद्यार्थी डॉ शैलेश डोंबेे व  डॉ. स्मिता गव्हाणे यांच्या हस्ते  उद्घाटन झाले 

तर प्रमाणपत्र पदके व बक्षीस वितरणाकरिता डॉ. पियुष  साळुंखे पाटील, डॉ.अजिंक्य नष्टे, डॉ. शैलेश डोंबे, मच्छिंद्र कळसुले, ॲड सुधीर वाघ, प्रताप आबा इंगोले, सुनील वाघमारे सर यांच्या हस्ते झाले.

या स्पर्धे मध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे श्री.जी.के.वाघमारे सर बँकॉक (थायलंड ) उत्कृष्ट कामगिरीनंतर कोल लांमपूर (मलेशिया) 

येथे आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या पुढील वाटचाली करता शुभेच्छा  देण्यात आल्या.

 स्पर्धा यशस्वी करण्याकरिता आंतरराष्ट्रीय कराटेपटू व राष्ट्रीय पंच निजेंद्र चौधरी, श्रावणी वाघमारे मॅडम, मयंक स्वामी, आशिष कोकरे, धनश्री एडगे, राधिका गारळे, आवेश फारुकी, अभिजीत बनसोडे उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments