google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 चेतनसिंह केदार सावंत यांच्या प्रयत्नाने सांगोल्यासाठी दहा ट्रान्सफार्मर मंजूर

Breaking News

चेतनसिंह केदार सावंत यांच्या प्रयत्नाने सांगोल्यासाठी दहा ट्रान्सफार्मर मंजूर

चेतनसिंह केदार सावंत यांच्या प्रयत्नाने सांगोल्यासाठी दहा ट्रान्सफार्मर मंजूर 


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (तालुका प्रतिनिधी): शेतीपंपाला पुरेशा दाबाने वीजपुरवठा व्हावा म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे वारंवार 

केलेल्या पाठपुराव्यामुळे डीपीडीसी मधून सांगोला तालुक्यासाठी दहा ट्रान्सफार्मर मंजूर झाले असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली. 

शेतीला अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याची मागणी केली होती.

 या मागणीला यश आले असून जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) बैठकीत सांगोल्यातील १० ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आले आहेत. 

सांगोला तालुक्यातील सपताळ मळा वासूद, महादेव लेंडवे वस्ती कडलास, कुंडलिक शिंदे वस्ती अकोला, गट नंबर १४५ खिलारवाडी, केदारवाडी वासूद, दिलीप कांबळे वस्ती आलेगाव , राजेश कांबळे वस्ती मेथवडे, बिरापुरी वासूद, 

राजेश संभाजी शिंदे वस्ती निजामपूर, ढगे डीपी सांगोला रोड वासूद या दहा अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार आहेत अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी दिली.

Post a Comment

0 Comments