google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला सोमवार दिनांक११/३/२०२४ रोजी शेतकरी कामगार पक्षाचा सांगोला मार्केट यार्डात मेळावा

Breaking News

सांगोला सोमवार दिनांक११/३/२०२४ रोजी शेतकरी कामगार पक्षाचा सांगोला मार्केट यार्डात मेळावा

सांगोला सोमवार दिनांक११/३/२०२४ रोजी शेतकरी कामगार पक्षाचा सांगोला मार्केट यार्डात मेळावा


शेतकरी कामगार पक्षाच्या व पुरोगामी युवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना व कार्यकर्त्यांना तसेच आबासाहेबांवरती प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांना कळविण्यात येते कि...

 सांगोला तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती पहाता पिण्याच्या पाण्याची सोय व जनावरांच्या चाऱ्याची सोय सरकारने ताबडतोब करावी 

तसेच शेतातील बहुतांश  पिके हातातुन गेलेलीच  आहेत याचा विचार करून विजेच्या बिलात सवलत द्यावी...शालेय विद्यार्थ्यांच्या फिज काही ठिकाणी भरमसाठ घेतल्या जातात

 त्यात सवलत द्यावी....तसेच घरकुलांची रखडलेली बिले अदा करावीत...तसेच ज्यांना निवाराच नाही अशांना घरकुलांचा लाभ मिळावा...

अनेक वेळा मागणी करुनही टेंभु म्हैसाळ योजनेच्या पाण्याने  नदीकाठचे बंधारे भरले गेले‌नाहीत ते भरुन घ्यावेत.तसेच निरा‌ उजव्या कालव्यातून ताबडतोब पाणी सोडण्यात यावे 

या व इतर काही मागण्यासाठी सोमवार दिनांक११/३/२०२४ रोजी शेतकरी कामगार पक्षाचा सांगोला मार्केट यार्डात मेळावा आयोजित करण्यात आला आहे...

 सदर मेळाव्यास आमदार जयंत पाटील साहेब उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत..तरी आपण हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे हि विनंती....

        आपलाच

*डॉ भाई बाबासाहेब देशमुख‌*

Post a Comment

0 Comments