google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ विषयावर प्रवचन संपन्न !अध्यात्मशास्त्र मानवाला चिरकाळ टिकणारा आनंद देऊ शकते !- चेतन राजहंस, सनातन संस्था

Breaking News

सोलापूर येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ विषयावर प्रवचन संपन्न !अध्यात्मशास्त्र मानवाला चिरकाळ टिकणारा आनंद देऊ शकते !- चेतन राजहंस, सनातन संस्था

 सोलापूर येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’


विषयावर प्रवचन संपन्न !अध्यात्मशास्त्र मानवाला चिरकाळ टिकणारा आनंद देऊ शकते !- चेतन राजहंस, सनातन संस्था 

सोलापूर आजच्या तणावयुक्त जीवनात अध्यात्मशास्त्र मानवाला चिरकाळ टिकणारा आनंद देऊ शकते. आनंदी जीवनासाठी प्रत्येकाला साधनेविना पर्याय नाही.

 बुद्धीअगम्य किंवा आध्यात्मिक कारणामुळे होणार्‍या दु:खाच्या निवारणासाठी साधना करणे आवश्यक आहे. आपल्या जीवनात जे दु:ख आलेले असते

 ते आपल्या कर्माचे फळ असते यालाच कर्मफलसिद्धांत म्हटले जाते. 84 लक्ष योनींतून प्रवास केल्यानंतर आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त होतो. त्यामुळे मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे. मनुष्यजन्मातच मोक्ष प्राप्त करता येतो.

 मोक्षप्राप्तीसाठी साधना करून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त होता येते, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले.

 दिनांक 6 मार्च 2024 या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने उपलप मंगल कार्यालय येथे ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.

 सनातन संस्थेला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मिनेश पुजारे यांनी केले. 

या वेळी श्री. चेतन राजहंस पुढे म्हणाले की कलियुगानुसार ‘नामस्मरण’ ही सर्वात सुलभ साधना आहे. आनंदप्राप्तीसाठी दररोज केले जाणारे प्रयत्न म्हणजे साधना होय.

 कुलदेवी ही आपल्या प्रारब्धाशी संबंधित देवता असल्याने कुलदेवीचा नामजप दररोज करावा आणि पूर्वजांचा त्रास होऊ यासाठी दरदरोज ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप किमान 1 तास करावा.

 कुलदेवी माहित नसल्यास ‘श्री कुलदेवतायै नम:’ असा नामजप करावा. विविध संत आणि प्रसिद्ध वैज्ञानिक नॉस्ट्रॅडॅमस यांनी केलेल्या भविष्यवाणीनुसार आपत्काळ येणार आहे.

 त्या काळात आपले रक्षण व्हावे यासाठी भगवंताचे भक्त बनण्याचा प्रयत्न करावा. या वेळी उपस्थित जिज्ञासूंनी श्री. चेतन राजहंस यांना साधनेविषयी विविध शंका आणि प्रश्न विचारून त्याचे समाधान करून घेतले.         

 आपला नम्र 

 *श्री. हिरालाल तिवारी,* सनातन संस्था

 (संपर्क क्रमांक - 9975592859)

Post a Comment

0 Comments