ब्रेकिंग न्यूज... लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर,
'या' तारखेला लागणार निकाल...7 टप्प्यात होणार मतदान!
सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल
संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद अखेर पार पडली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा असलेल्या 48 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
त्यानुसार, या दिवशी मतदान होईल आणि या दिवशी मतमोजणी होणार आहे.महाराष्ट्रामध्ये मागील अडीच वर्षांमध्ये राजकीय उलथापालथ झाली. आधी महाविकास आघाडी सत्तेतं आलं आणि त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली.
त्यानंतर आता महायुती सरकार स्थापन झालं आहे. राज्यात एकूण लोकसभा जागा आहे. त्यासाठी निवडणूक होणार आहे.
7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या अकरा मतदार संघाच्या मतदानामध्ये सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये
मतदान होणार आहे.निवडणुकीच्या घोषणेसोबतच देशात आचारसंहिता लागू झाल्याचंही कुमार यांनी जाहीर केलं.
आचारसंहितेचा भंग केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. महाराष्ट्रात पाहिला टप्पा 11 एप्रिलला, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, पाचवा टप्प्यात 20 मे रोजी मतदान होईल.
लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर, 'या' तारखेला लागणार निकाल...7 टप्प्यात होणार मतदान!
देशातील लोकसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर झाल्या आहेत. यासोबतच काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही जाहीर होणार आहेत.
लोकसभा आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक आयोगाने आज (शनिवार) दुपारी ३ वाजता पत्रकार परिषदेत सांगिलते.
सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून रोजी संपत असून त्यापूर्वी नवीन सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कूमार यांनी ही घोषणा केली आहे.
लोकसभेच्या निवडणुकांना १९ (शुक्रवार) एप्रील २०२४ पासून सुरुवात होणार आहे. तर ४ जूनला निकाल लागणार आहे. दिड कोटी कर्मचारी निवडणूक पार पाडतील. देशात ९७ कोटीहून अधिक मतदार आहेत. तर साडे दहा लाखांहून अधिक मतदान केंद्र आहेत. ७ टप्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत.
पहील्या टप्प्यातील निवडणूक १९ एप्रीला होणार आहे.
दुसरा टप्पा - ४ (गुरुवार) एप्रिल पासून अर्ज भरता येणार तर २६ (शुक्रवार) एप्रिल २०२४ ला मतदान होणार आहे.
तिसरा टप्पा - ७ (मंगळवार) मे ला मतदान होणार आहे. तर १२ राज्यांमध्ये निवडणुका होणार
चौथा टप्पा - १३ (सोमवार) मे ला मतदान
पाचवा टप्पा - २० (सोमवार) मे ला मतदान
सहावा टप्पा - २५ (शनिवार) मे ला मतदान
सातवा टप्पा - १ (शनिवार) जून ला मतदान
महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान होणार आहे. तर २० मे (सोमवार) रोजी मतदान होणार आहे.
कोणत्या टप्प्यात कोणते राज्य -
एका टप्यात मतदान होणारी राज्ये - (२२ राज्य) - अरुणाचल प्रदेश, अंदमान निकोबार, दिल्ली, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरियाणा, केरला, लक्षदिप, लडाख, मिझोराम, मेघालय, नागालँड, पाँडिचेरी , सिक्कीम, तमिळनाडू, पंजाब, तेलंगणा, उत्तराखंड
दोन टप्यात मतदान होणारी राज्ये - कर्नाटक, राजस्थान, त्रिपूरा , मणिपूर
तीन टप्यात मतदान होणारी राज्ये - छत्तीसगड, असाम
चार टप्यात मतदान होणारी राज्ये - ओडिसा, मध्य प्रदेश, झारखंड
पाच टप्यात मतदान होणारी राज्ये - महाराष्ट्र जम्मू आणि काश्मिर
सात टप्यात मतदान होणारी राज्ये - उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल
देशात पारदर्शक आणि निष्पक्ष निवडणुका कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पाडण्यासाठी, निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहितेच्या स्वरूपात काही नियम आणि मानके निश्चित केली आहेत.
तरतुदी काय आहेत?
निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष, उमेदवार आणि मतदारांसाठी सामान्य आचरणापासून ते सभा, मिरवणुका, मतदान, मतदान केंद्र, निरीक्षक आणि जाहीरनामा यांसाठी नियमावली निश्चित केली आहे.
राजकीय पक्ष आणि नेत्यांसाठी नियमावली
विविध जाती आणि समुदायांमध्ये मतभेद किंवा द्वेष वाढवणाऱ्या क्रियाकलापांमध्ये गुंतू नका.
-धोरणे आणि कृतींवर टीका करा, कोणत्याही पक्षाच्या, नेत्याच्या किंवा कार्यकर्त्याच्या वैयक्तिक जीवनावर भाष्य करू नका. कोणत्याही जाती-पंथाच्या भावनांचा वापर करून मतदान करण्याचे आवाहन करू नका.
मंदिर, मशीद किंवा इतर कोणत्याही प्रार्थनास्थळाचा निवडणूक प्रचारासाठी वापर करू नये.
मतदारांना लाच देणे, त्यांना धमकावणे, मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आत प्रचार करणे हे गुन्हेगारी कृत्य मानले जाईल.
मतदानाच्या ४८ तास आधी निवडणूक प्रचार आणि सार्वजनिक सभांवर बंदी लागू होईल.
कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या घरासमोर आंदोलने व धरणे करू नयेत.
नेते आपल्या समर्थकांना त्याच्या परवानगीशिवाय कोणत्याही व्यक्तीची जमीन, इमारत, परिसर भिंती इत्यादींवर झेंडे लावण्याची, बॅनर लावण्याची, माहिती पेस्ट करण्याची आणि घोषणा लिहिण्याची परवानगी देऊ शकत नाहीत.
राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी त्यांच्या समर्थकांनी इतर पक्षांच्या सभा किंवा मिरवणुकीत अडथळे निर्माण करणार नाहीत किंवा त्यांना अडथळा आणण्याचा प्रयत्न करणार नाही याची काळजी घ्यावी.
ज्या ठिकाणी इतर पक्षांच्या सभा सुरू आहेत त्या ठिकाणी कोणत्याही पक्षाने मिरवणूक काढू नये. एका पक्षाने लावलेली पोस्टर्स दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काढू नयेत.
सभा/रॅली -
सर्व रॅलीचे ठिकाण व ठिकाण याबाबत पोलिस अधिकाऱ्यांना अगोदर माहिती द्यावी.
राजकीय पक्ष आणि नेत्यांनी ज्या ठिकाणी ते संमेलन घेणार आहेत त्या ठिकाणी आधीपासून कोणतेही निर्बंध नाहीत याची खात्री करून घ्यावी.
तसेच सभेत लाऊडस्पीकर वापरण्यासाठी परवानगी घ्यावी.
कोणतीही अनपेक्षित घटना घडू नये यासाठी सभेच्या आयोजकांनी पोलिसांची मदत घ्यावी.
मिरवणुकीसाठी काय नियम आहेत?
मिरवणूक सुरू होण्यापूर्वी त्याची सुरुवात, मार्ग आणि समाप्तीची वेळ आणि ठिकाण याची आगाऊ माहिती पोलिसांना द्यावी लागेल.
तुम्ही ज्या भागातून मिरवणूक काढत आहात त्या भागात काही निर्बंध आहेत का ते आधी शोधा.
वाहतुकीवर परिणाम होणार नाही अशा प्रकारे मिरवणुकीचे व्यवस्थापन करा.
एकाहून अधिक राजकीय पक्षांनी एकाच दिवशी आणि एकाच मार्गावर मिरवणूक काढण्याचा प्रस्ताव दिल्यास वेळेची अगोदर चर्चा करा.
रस्त्याच्या उजव्या बाजूने मिरवणूक काढावी.
मिरवणुकीत शस्त्रे किंवा इतर हानिकारक साहित्य सोबत ठेवू नका.
कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या सूचना व सल्ल्याचे काटेकोरपणे पालन करावे.
मतदानाच्या दिवशी सूचना-
मतदानाच्या दिवशी सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी याची खात्री करणे आवश्यक आहे-
राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी त्यांच्या अधिकृत कार्यकर्त्यांना बॅज किंवा ओळखपत्र द्यावे.
निवडणूक ड्युटीवर तैनात असलेल्या अधिकाऱ्यांचे सहकार्य असावे.
मतदारांना दिलेली स्लिप साध्या कागदावर असावी, त्यावर कोणत्याही प्रकारचे चिन्ह, उमेदवार किंवा पक्षाचे नाव नसावे.
मतदानाच्या दिवशी आणि त्याच्या ४८ तास आधी दारूचे वाटप कोणालाही करू नये.
मतदान केंद्राजवळ उभारण्यात आलेल्या शिबिरांमध्ये अनावश्यक गर्दी जमवू नका.
शिबिराच्या सामान्य भागात कोणतेही पोस्टर, ध्वज, चिन्ह किंवा इतर प्रचारात्मक साहित्य प्रदर्शित करू नये.
मतदानाच्या दिवशी वाहन चालवण्याचे परमिट मिळवा.
मतदान केंद्र: मतदारांशिवाय, ज्यांच्याकडे निवडणूक आयोगाचा वैध पास नाही अशा कोणत्याही व्यक्तीने मतदान केंद्रात प्रवेश करू नये.
निरीक्षक: निरीक्षकांची नियुक्ती निवडणूक आयोगाकडून केली जाते. उमेदवारांना किंवा त्यांच्या एजंटना निवडणुकीच्या कारभाराबाबत काही तक्रारी असल्यास ते निरीक्षकांच्या निदर्शनास आणून देऊ शकतात.
सत्ताधारी पक्षाचे नियम काय?-
मंत्र्यांनी अधिकृत दौऱ्यात प्रचार करू नये.
पक्षाच्या हितासाठी सरकारी विमाने आणि वाहने वापरू नका.
पक्षाच्या हितासाठी सरकारी यंत्रणा आणि कर्मचाऱ्यांचा वापर करू नका.
हेलिपॅडवर सत्ताधारी पक्षाची मक्तेदारी दाखवू नका.
सरकारी निधीतून पक्षाचा प्रचार करू नका.
केंद्र किंवा राज्य सरकारचे मंत्री, उमेदवार, मतदार किंवा एजंट वगळता इतर लोकांनी मतदान केंद्रात प्रवेश करू नये.
0 Comments