मोठी बातमी! दुहेरी हत्याकांडाने राज्य हादरला पतीकडून पत्नी आणि मुलीचा निर्घृण खून,
राज्यात गुन्हेगारीने कळस गाठला आहे. पुण्यातील कात्रज येथे आर्थिक आणि कौटुंबिक वादातून पतीने आपल्या पत्नीचा आणि मुलीचा झोपेत
त्यांच्यावर चाकूने वार करून तसेच हाताची नस कापून आणि उशीने तोंड दाबून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दुहेरी हत्याकांडाचा हा प्रकार भारती विद्यापीठ जवळील दत्तनगर येथे आज सकाळी उघडकीस आला.
श्वेता तळेवाले (वय ४०), शिरोली तळेवाले (वय १६) अशी खून झालेल्या आई आणि मुलीची नावे आहे. अजय तळेवाले (वय ४५) असे खून करणार्या आरोपी पतीचे नाव आहे. दरम्यान, खून केल्यावर आरोपी हा स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाला.
या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजय आणि पत्नी श्वेता यांच्यात आर्थिक विवंचनेतून गेल्या काही दिवसांपासून भांडणे होत होती.
काल रात्रीदेखील दोघांमध्ये मोठे भांडण झाले. यानंतर या भांडणाला कंटाळून मुलीला घेऊन माहेरी जाईल असे श्वेता रागाने म्हणाली. याचा अजयला राग आला.
भांडणानंतर श्वेता ही मुलीसोबत झोपली. दरम्यान, अजयने झोपलेल्या श्वेताच्या हाताची नस कापली. तिच्यावर चाकूने वार केला आणि तिचे आणि मुलीचे तोंड दाबून दोघींचा खून केला. मुलगी आईची बाजू घेत असल्याने अजयने तिची हत्या केली.
0 Comments