google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज..पैसे, दारू आणि मोफत वस्तू वाटणाऱ्यांवर होणार कडक कारवाई केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार

Breaking News

ब्रेकिंग न्यूज..पैसे, दारू आणि मोफत वस्तू वाटणाऱ्यांवर होणार कडक कारवाई केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार

ब्रेकिंग न्यूज..पैसे, दारू आणि मोफत वस्तू वाटणाऱ्यांवर होणार कडक कारवाई केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार


लोकसभा निवडणुकांच्या तारखा आज केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्या. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.

 एकूण सात टप्प्यात मतदान होणार असून ४ जूनला निकाल लागणार आहे. पाच लाख मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

 दरम्यान निवडणूक आयोगाने निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांसाठी काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. एखाद्या उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल तर त्याला तीन वेळा वृत्तपत्रात माहिती द्यावी लागेल.

 त्या पक्षाला त्याची माहिती द्यावी लागणार आहे. बेकायदेशीर पैसे, दारू, ड्रग्ज आणि मोफत वस्तू वाटणाऱ्यांवर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित यंत्रणांना दिले आहेत, अशी माहिती आयुक्तांनी दिली.

Post a Comment

0 Comments