google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी...सोलापूर जिल्ह्यातील पोलिस अधीक्षकांनी दमदार कारवाई करत दोन टोळ्यांना मोक्का लावला चौघे स्थानबद्ध, तर 61 जणांना हद्दपार केले.

Breaking News

मोठी बातमी...सोलापूर जिल्ह्यातील पोलिस अधीक्षकांनी दमदार कारवाई करत दोन टोळ्यांना मोक्का लावला चौघे स्थानबद्ध, तर 61 जणांना हद्दपार केले.

मोठी बातमी...सोलापूर जिल्ह्यातील पोलिस अधीक्षकांनी दमदार कारवाई


करत दोन टोळ्यांना मोक्का लावला चौघे स्थानबद्ध, तर 61 जणांना हद्दपार केले.

सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणेने धडक प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. सराईत गुन्हेगारांना नियंत्रणात ठेवण्यासाठी दोन टोळ्यांना मोक्का कायदा लावण्यात आला.

सराईत गुन्हेगारांना नियंत्रणात ठेवण्यासाठी दोन टोळ्यांना मोक्का कायदा लावण्यात आला.

 चार जणांना स्थानबद्ध केले तर ६१ जणांवर हद्दपारीची कारवाई केली. ग्रामीण भागातील सराईत गुन्हेगारांची माहिती संकलित केली जात आहे.

 सध्याचे वर्तन आणि निवडणूक काळात सामाजिक सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कारवाईचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक कार्यालयाने सादर केला होता.

त्यानुसार जिल्हा दंडाधिकारी कार्यालय आणि पोलिस अधीक्षक यांनी संयुक्त कारवाई केली. सद्दाम रशीद शेख (रा. विरवडे बु., , ता. मोहोळ), (रा. कुडू, ता. माढा), विशाल विठ्ठल रणदिवे (रा. झाडबुके मैदान, बार्शी ता. बार्शी)

 आणि ऋषी उर्फ ऋषीराज सतीश बाबर (रा. सोनंद, ता. सांगोला) या चौघांना येरवाडा कारागृह, पुणे येथे स्थानबद्ध केले. गंभीर गुन्हे करणाऱ्या 2 दोनारान् करणा मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली. त्यामध्ये एकूण ८ जण आहेत. 

पंढरपूर येथील टोळीविरुद्ध दाखल गुन्ह्याचा तपास उपअधीक्षक अर्जुन भोसले यांनी तर माढा तालुक्यातील टोळीवरील गुन्ह्याचा तपास उप अधीक्षक अजित पाटील करत आहेत. वेगवेगळ्या कालावधीसाठी २० जणांना हद्दपार केले. 

दोन पेक्षा जास्त गुन्हे असणाऱ्या ४१ गुन्हेगारांना संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशाने तडीपार केले. पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर, नायब तहसीलदार बनसोडे यांच्या पथकाने कारवाई केली.

Post a Comment

0 Comments