google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला -सांगोल्यात अन्नसुरक्षा अधिकारी दक्षता पथक व पोलिसांनी छापा टाकून पकडलेल्या प्रतिबंधीत गुटखा प्रकरणातील मुख्य आरोपीस अटक करून गुन्हाचा सखोल तपास करावा अशी मागणी सांगोला पोलीस स्टेशनला निवेदनाद्वारे केली माजी नगरसेवक सुरज बनसोडे

Breaking News

सांगोला -सांगोल्यात अन्नसुरक्षा अधिकारी दक्षता पथक व पोलिसांनी छापा टाकून पकडलेल्या प्रतिबंधीत गुटखा प्रकरणातील मुख्य आरोपीस अटक करून गुन्हाचा सखोल तपास करावा अशी मागणी सांगोला पोलीस स्टेशनला निवेदनाद्वारे केली माजी नगरसेवक सुरज बनसोडे

सांगोला -सांगोल्यात अन्नसुरक्षा अधिकारी दक्षता पथक व पोलिसांनी छापा टाकून पकडलेल्या प्रतिबंधीत गुटखा प्रकरणातील मुख्य आरोपीस अटक करून गुन्हाचा सखोल तपास करावा


अशी मागणी सांगोला पोलीस स्टेशनला निवेदनाद्वारे केली माजी नगरसेवक सुरज बनसोडे 

 दिलीप रामचंद्र मस्के यास अटक करून  गुन्हाचा सखोल तपास करावा अशी मागणी माजी नगरसेवक सुरज बनसोडे यांनी सांगोला पोलीस स्टेशनला निवेदनाद्वारे केली आहे.

सांगोल्यात प्रतिबंधित २५ लाखांच्या गुहख्यासह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाची कारवाई अन्न औषध भेसळ प्रशासन दक्षता विभाग व सांगोला पोलीस स्टेशन यांनी संयुक्त पणे २६ मार्च रोजी 

सांगोला बनकर वस्ती येथे छापा टाकून सुमारे २६ लाख ४८ हजार रुपयेच्या प्रतिबंधित गुटख्यासह ५ लाखाचे पिकअप वाहन जप्त करून कारवाई केली होती.

 या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे यांच्या फिर्यादीवरून मुख्य आरोपी दिलीप रामचंद्र मस्के सह चार आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

 दिलीप मस्के यांचे विरुद्ध यापूर्वी पंढरपूर, अकलूज, बारामती, पुणे, आटपाडी आदी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत 

परंतु दुर्दैवाने सांगोला पोलीस स्टेशनला आज पावतो त्याचे विरुद्ध अर्थपूर्ण वाटाघाटी व राजकीय वरदहस्तामुळे एकही गुन्हा दाखल झालेला नव्हता आता सुदैवाने गुन्हात त्याचे नाव आलेले आहे.

 तपास अधिकारी यांनी सदर गुन्ह्यात मुख्य आरोपी दिलीप रामचंद्र मस्के यास अटक करून गुन्हाचा सखोल तपास  करावा अन्यथा आमच्या संघटने कडून पोलीस स्टेशन समोर लोकशाही मार्गाने आंदोलन

 करावे लागेल असे पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात रिपब्लिकन पँथर ऑफ इंडिया सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष सुरज बनसोडे यांनी  नमूद केले आहे

Post a Comment

0 Comments