google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पंढरपूर -दादर रेल्वेचा सातारा पर्यंत विस्तार, सांगोलकरांची गैरसोय दूर होणार

Breaking News

पंढरपूर -दादर रेल्वेचा सातारा पर्यंत विस्तार, सांगोलकरांची गैरसोय दूर होणार

 पंढरपूर -दादर रेल्वेचा सातारा पर्यंत विस्तार, सांगोलकरांची गैरसोय दूर होणार


अशोक कामटे संघटनेच्या पाठपुरावाला यश

सांगोला (प्रतिनिधी) (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

पंढरपूर -दादर रेल्वेचा विस्तार मिरजपर्यंत करावा या मागणी करिता शहीद अशोक कामटे बहुतदेशीय सामाजिक संघटनेने रेल्वे विभागाकडे गेल्या चार वर्षापासून पाठपुरावा सुरू ठेवलेला होता 

,प्रवाशांची वाढती मागणी व गरज विचारात घेऊन रेल्वे प्रशासनाने विस्तारास मंजुरी  दिली आहे.

रेल्वे क्रमांक 11027 व 11028 दादर -पंढरपूर एक्सप्रेस ही पूर्वी पंढरपूर पर्यंत आठवड्यातून तीन दिवस धावत होती या रेल्वेचा विस्तार करावा 

याकरिता अशोक कामटे संघटनेने 2019 ते 2024 या चार वर्षाच्या कालावधीत केंद्रीय रेल्वेमंत्री ,राज्यमंत्री ,खासदार ,रेल्वेचे

 महाव्यवस्थापक विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्याकडे वारंवार निवेदने,  स्मरण पत्र देऊन पाठपुरावा केला होता त्याची दखल घेऊन सोलापूर विभागातून धावणाऱ्या या रेल्वेस सर्वच विभागात थांबे मिळाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

या विस्तारित रेल्वेमुळे सांगोला परिसरातील प्रवाशांना मुंबई ,पुणे ,भिलवडी, किर्लोस्करवाडी ,ताकारी ,कराड ,मसूर ,कोरेगाव, सातारा येथे जाण्याकरता थेट सांगोल्यातून या रेल्वेने प्रवास करता येणार आहे. 

मुंबई व सातारा येथे नागरिकांना अल्प वेळेत, अल्प खर्चात पोहचणार आहे त्यास रेल्वे बोर्डानेहि मंजुरी दिल्याने लवकर ही सेवा सुरू होणार असल्याचे शहीद अशोक कामटे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments