google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी...सांगोला तालुक्यातील रेशन वरील मोफत धान्य लाटणाऱ्या नोकरदारांवर कारवाई करण्याचे तहसीलदार संतोष कणसे यांचे पुरवठा विभागाला आदेश !

Breaking News

मोठी बातमी...सांगोला तालुक्यातील रेशन वरील मोफत धान्य लाटणाऱ्या नोकरदारांवर कारवाई करण्याचे तहसीलदार संतोष कणसे यांचे पुरवठा विभागाला आदेश !

मोठी बातमी...सांगोला तालुक्यातील रेशन वरील मोफत धान्य लाटणाऱ्या नोकरदारांवर


कारवाई करण्याचे तहसीलदार संतोष कणसे यांचे पुरवठा विभागाला आदेश !

(शब्दरेखा एक्सप्रेस संपादक संतोष साठे ९३०३४८७८१२)

सांगोला प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन पुरवठा विभागाकडून अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखाली व काही प्रमाणात केसरी शिधापत्रिकाधारकांना

 या योजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्ती पाच किलो मोफत धान्य दिले जाते ही योजना गरिबांसाठी असताना सांगोला शहर व तालुक्यातील १७०  नावे या योजनेत समाविष्ट असल्याचे

 पुरवठा अधिकारी नितीन जाधव व पुरवठा निरीक्षक सौ दराडे मॅडम यांनी व गरजूंना या योजनेचा लाभ मिळत नसल्याची माहिती पुरवठा विभाग व तहसीलदार श्री संतोष कणसे यांना दिली आहे.

या  योजने अंतर्गत लाभ घेतलेल्या नोकरदारांकडून शासन बाजारभावाप्रमाणे रेशन धान्याचे वसूल करणार असून त्याप्रमाणे नोटीस बजावण्याचे काम चालू करण्यात आले आहे

 संबंध १७० नोकरदारांवर योग्य ती कडक कारवाई केली जाईल व पिवळ्या शिधापत्रिका धारकांची सखोल तपासणी करणार असल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले

 पुरवठा विभागाकडून रेशन कार्ड आधार कार्ड व मोबाईल क्रमांक एकमेकांशी लिंक होण्याने अनेक शासकीय कर्मचारी या योजनेत समाविष्ट असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांना दिसून आले आहे.

त्याची माहिती जिल्हाधिकार्यालय व तहसील कार्यालय यांना दिली असून पुरवठा विभाग या कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना नोटीस बजावून त्यांना एकत्रित कुटुंबतील असल्यास विभक्त करून घेणे रेशनचा लाभ सोडणे असे पर्याय दिले जातील 

व तसे न झाल्यास आतापर्यंत उचललेल्या धान्याची बाजारभावानुसार रक्कम वसूल केली जाईल अशी माहिती तहसीलदार संतोष कणसे यांनी दिली आहे

Post a Comment

0 Comments