मोठी बातमी..कृषी विभागाच्या पुरस्कारात सोलापूर जिल्ह्याची बाजी सांगोला तालुक्यातील दोघांचा समावेश
राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून शेतीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कृषिभूषण, कृषिरत्न, शेतीनिष्ठ, शेतीमित्र
अशा विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, त्यात सोलापूर जिल्ह्याने विविध विभागांतील १७ पुरस्कार मिळवत बाजी मारली आहे.२०२० ते २०२२ या तीन वर्षांतील पुरस्कार
शुक्रवारी (ता. २३) जाहीर झाले. यामध्ये चौंडेश्वरवाडी (ता. माळशिरस) येथील तानाजीराव इंगवले- देशमुख यांना २०२० चा कृषिभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नुकतीच या पुरस्कारांची निवड झाली.
त्यानंतर शुक्रवारी कृषी विभागाने या संबंधीचे परिपत्रक काढून नावे जाहीर केली. संपूर्ण महाराष्ट्रातून देण्यात येणाऱ्या या पुरस्कारांमध्ये 'सकाळ-ॲग्रोवन'चे प्रतिनिधी
सुदर्शन सुतार यांना २०२१ चा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार मिळाला आहे.त्याशिवाय जिल्ह्यातील इतर पुरस्कारार्थींमध्ये युवा शेतकरी पुरस्कार २०२०- महेश राजेंद्र पाटील, अकोले बु. (ता. माढा),
वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार २०२१-आबासाहेब तुकाराम बंडगर, शिरभावी (ता. सांगोला), कृषिभूषण (सेंद्रिय शेती२०२१)- जगन्नाथ पंढरीनाथ मगर, निमगाव (म) (ता. माळशिरस), उद्यान पंडित २०२०- समाधान अभिमन्यू भोसले,
पापरी (ता. मोहोळ), शेतीनिष्ठ पुरस्कार- शिवानंद होनमुटे, कळमण (ता. उत्तर सोलापूर), युवा शेतकरी पुरस्कार २०२१- डॉ. किशोर सुभाष शिंदे, पाकणी (ता. उत्तर सोलापूर),
उद्यान पंडित २०२१- बाळासाहेब नामदेव काळे, मु. कामोणे पो. पोथरे (ता. करमाळा), वसंतराव नाईक कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार २०२१- सोमनाथ भास्कर हुलगे, बेंबळे (ता. माढा) वसंतराव नाईक
कृषिभूषण पुरस्कार २०२२ शशिकांत शंकर पुदे, शेजबाभूळगाव (ता. मोहोळ) व अतुल प्रभाकर बागल, गादेगाव (ता. पंढरपूर), कृषिभूषण (सेंद्रिय शेती पुरस्कार २०२२) वासुदेव भास्कर गायकवाड, चळे (ता. पंढरपूर),
युवा शेतकरी पुरस्कार २०२२ -महेश आसबे, उद्यानपंडित २०२२- नाना यशवंत माळी, गौडवाडी (ता. सांगोला) पद्मश्री विठ्ठलराव कृषी सेवारत्न पुरस्कार २०२० सतीश कुंडलिक कचरे,
मंडल कृषी अधिकारी, नातेपुते, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार २०२२-विजयसिंह रामचंद्र चव्हाण, खुनेश्वर (ता. मोहोळ) यांचा त्यात समावेश आहे. लवकरच या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
0 Comments