आगामी निवडणुकीत मी किमान ४० हजार मतांनी निवडून येईल - आमदार शहाजी बापू पाटील मला त्याबद्दल अहंकार नाही
पण मी मतदारसंघात कामे केली आहेत. त्या जोरावर मी निश्चित निवडून येईल,
सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आणि शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांची विधाने कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतात.
आज शहाजी बापू पाटील हे पुणे दौर्यावर होते. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बोलताना अनेक घडामोडींवर भाष्य केले.
आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये तुमचा पाठिंबा कोणाला असणार आणि तुम्ही शिवसेना सोडून शिंदे गटात गेल्याने तुमच्यावर
सांगोला विधानसभा मतदारसंघातील नागरिक नाराज आहे. याबाबत आमदार शहाजी बापू पाटील यांना प्रश्न विचारला
असता ते म्हणाले की, माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा असणार आहे. तसेच मोहिते पाटील यांच्याकडून कोणताही उमेदवार असला
तरी माझा पाठिंबा हा रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनाच असणार आहे. त्यांनी मतदारसंघात विविध विकास कामे केली असल्याचे त्यांनी सांगितले.
माझ्यावर मतदारसंघात कोणीही नाराज नाही. माझ्या प्रत्येक निवडणुकीत मला मतदान करणार्या मतदाराची संख्या वाढत गेली आहे. हे आजवरच्या निवडणुकीत दिसून आले आहे.
मी आजवर पाच वेळा हरलो आणि दोन वेळेस निवडून आलो आहे. आगामी निवडणुकीत मी किमान ४० हजार मतांनी निवडून येईल. मला त्याबद्दल अहंकार नाही
पण मी मतदारसंघात कामे केली आहेत. त्या जोरावर मी निश्चित निवडून येईल, तसेच गणपतराव देशमुख यांना चकवा देऊन दोन निवडणुकीत निवडून आलोच ना, अशी भूमिका शहाजी बापू पाटील यांनी मांडली.
0 Comments