google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अभिनय सम्राट, विनोदाच्या अचूक टायमिंगचे बादशाह अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

Breaking News

अभिनय सम्राट, विनोदाच्या अचूक टायमिंगचे बादशाह अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

अभिनय सम्राट, विनोदाच्या अचूक टायमिंगचे बादशाह अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर


मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत पाच दशके 'बहुरुपी' बनून आपल्या अभिनयाचे गारुड घालणारे अभिनय सम्राट, विनोदाच्या अचूक टायमिंगचे बादशाह अशोक सराफ यांना 'महाराष्ट्र भूषण' हा राज्याचा सर्वोच्च पुरस्कार आज जाहीर झाला.

कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी त्यांना हा सन्मान मिळाला. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि २५ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आजवर कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा न करता आयुष्यभर फक्त प्रेक्षकांसाठी काम करणाऱ्या अशोकमामांना पुरस्कार जाहीर

 होताच त्यांचे चाहते सुखावले, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करू लागले.या प्रेमाने भारावलेल्या अशोक सराफ यांनी 'प्रेक्षक आहेत तर मी आहे,' या कृतकृत्य भावना व्यक्त केल्या.

ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना २०२३ वर्षाचा मानाचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर केली. 'अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे 

तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छटांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले,' असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करताना म्हटले.

'लगीन घाई', 'सारखं छातीत दुखतंय', 'प्रेमा तुझा रंग कसा?', 'मनोमिलन', 'झालं एकदाचं', 'हमीदाबाईची कोठी', 'संगीत संशयकल्लोळ', 'हसतखेळत' आदी नाटकांतील भूमिका गाजल्या.

दादा कोंडके यांच्याबरोबर 'पांडू हवालदार', 'कळत नकळत', 'भस्म' यांसारखे चित्रपट 'आयत्या घरात घरोबा', 'एक डाव भुताचा', 'वजीर', 'भस्म्या', 'खरा वारसदार', 'धूमधडाका', 'गंमतजंमत' असे अनेक चित्रपट गाजले. हिंदीतही ते गाजले.

पाच दशकांची प्रदीर्घ वाटचाल -

अशोक सराफ यांचा जन्म ४ जून १९४७ सालचा. त्यांचे बालपण ग्रॅण्ट रोड येथील चिखलवाडीत गेले. गोपीनाथ सावकार हे त्यांचे मामा होत. 

वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी शिरवाडकरांच्या 'ययाती आणि देवयानी' नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवले. काही संगीत नाटकांतूनदेखील त्यांनी भूमिका केल्या. ते बँकेत नोकरीला होते.

अशोक सराफ यांनी ३००हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, महेश कोठारे यांच्यासोबतचे त्यांचे चित्रपट तुफान गाजले. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे

 तर अभिनयातून विविध छटांचे दर्शन घडवले. 'वजीर' सारख्या चित्रपटातून राजकारणी व्यक्तिरेखा अशोक सराफ यांनी साकारली तर 'चौकट राजा' मध्येही वेगळी भूमिका केली.

Post a Comment

0 Comments