खळबळजनक.... सांगोला पोलिसांची टोलेजंग कारवाई ; रस्त्यालगत रोपे विकणा-या व
हातगाडीवर कलिंगड विकणाऱ्या विरुद्ध वहातूकीस अडथळा निर्माण केला म्हणून भरला खटला !
सांगोला प्रतिनिधी ; सांगोला शहरात पेट्रोलिंग करत असताना दि.३१ जानेवारी रोजी सांगोला पोलिसांनी मोठी टोलेजंग कारवाई केल्याचे समोर आले आहे.
फिर्यादी, पोहेकॉ ७४१ चंद्रकांत गैरीहार बोधगिरे व पोहेकॉ १५९६ घुले, पोना ४०२ वाकीटोळ असे मिळून सांगोला शहर येथे पेट्रोलिंग करित करीत असताना शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान जवळ रस्त्याच्या कडेला
रोप विक्री करत असल्यामुळे रस्त्याने येणा-या - जाणा-या वाहतूकीस व लोंकानां अडथळा होईल असे स्थितीत मिळुन आला म्हणून,आरोपी चंद्रभुषण कुमार घुरण राय
त्याच्या विरुध्द भा.द.वि कलम २८३ प्रमाणे व कडलास चौक सांगोला येथे हातगाडीवर कलिंगड विक्री करणाऱ्या आरोपी रघुनाथ तायाप्पा जाधव यांच्यावर वाहतुकीस अडथळा
करुन रस्त्याने येणारे-जाणारे लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे परीस्तीथीत मिळुन आला म्हणुन भा.द.वि कलम २८३ प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
हि कारवाई म्हणजे " चोर सोडून ... फाशी " देण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. खरं पाहिले तर सांगोला शहर व तालुक्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्याच्या कडेला वहातूकीस अडथळा
निर्माण करून वर्षानुवर्षे दुकाने थाटून बसलेल्या दुकानदारांवर कारवाई करण्याची गरज असताना गोरगरीबांवर जाणीव पुर्वक कारवाई करून,कारवाईचा फार्स करण्यात आला आहे.
सांगोला पोलिसांनी शहर व तालुक्यात सुरू असलेल्या सर्व प्रकारच्या अवैध धंद्यावर ख-या अर्थाने कारवाई करण्याची गरज असताना,काहीतरी थातुरमातुर कारवाई करून नागरिकांच्या रोषाला कारण ठरु नये.
पोलिसांनी सिंगम स्टाईलने पोलीसगीरी दाखवून कारवाई केली तर नागरिकांमधून पोलिसांची स्तुती केली जाते.परंतु भर रस्त्यावर थांबून वहाने अडवून चालकांकडून चिरीमिरी गोळा करायची,दारू विक्री करणारा वेळेत हप्ता देत नाही
म्हणून त्याची दारू उचलून आणायची त्याच्यावर केस करायची ,ट्रॅव्हल्सचे हप्ते, अवैध प्रवासी वहातूक हप्ते, जुगार, मटका, गुटखा, वाळू,यातून जमा होणारी "माया" हे काय नवीन नाही.
परंतु पोलिसांनी गोरगरीबांवर अन्याय न करता समज देवून व ख-या गुन्हेगारावर समाधानकारक कारवाई करण्याची गरज असल्याचे नागरिकांना मधून बोलले जाते.
0 Comments