google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी..शरद पवारांच्या पक्षाला मिळालं नवं निवडणूक चिन्ह; निवडणूक आयोगाची घोषणा

Breaking News

मोठी बातमी..शरद पवारांच्या पक्षाला मिळालं नवं निवडणूक चिन्ह; निवडणूक आयोगाची घोषणा

मोठी बातमी..शरद पवारांच्या पक्षाला मिळालं नवं निवडणूक चिन्ह; निवडणूक आयोगाची घोषणा


शरद पवार यांच्या 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार' या पक्षाला नवं निवडणूक चिन्ह मिळालं आहे. निवडणूक आयोगानं 'तुतारी फुंकणारा माणूस' हे चिन्ह त्यांच्या पक्षाला बहाल केलं आहे.

पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याची माहिती देण्यात आली. (ncp sharad pawar group got new election symbol trumpet election commission announcement)

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १५ फेब्रुवारी दिलेल्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे पक्ष चिन्ह अजित पवार यांच्या गटाला बहाल केलं. 

यानंतर शरद पवार यांच्या गटाकडून पक्षाच्या नाव्या नावाचे आणि चिन्हाचे तीन पर्याय निवडणूक आयोगाकडं सादर करण्यात आले होते. त्यांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार हे नाव काही दिवसांपूर्वीच आयोगानं दिलं. 

पण चिन्ह बहालं केलं नव्हतं.दरम्यान, नार्वेकरांच्या निकालाविरोधात शरद पवार गटाकडून दाखल याचिकेवर सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. 

यावेळी सुप्रीम कोर्टानं शरद पवारांच्या पक्षाचं सध्याचं नाव येत्या लोकसभा निवडणुकीपर्यंत काम ठेवतानाच लवकरात लवकर चिन्ह देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला दिले होते.

 त्यानुसार, गुरुवारी रात्री उशीरा निवडणूक आयोगानं पवारांच्या गटाकडून दिलेल्या पर्यायांचा विचार करता 'तुतारी फुंकणारा माणूस' हे चिन्ह निवडणूक आयोगानं शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बहाल केलं.

Post a Comment

0 Comments