लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने
पंचायत समिती सभागृह सांगोला येथे आढावा बैठक
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मा. श्रीम. मोनिका सिंह, निवडणूक निर्णय अधिकारी, ४३ माढा लोकसभा मतदार संघ तथा अप्पर जिल्हाधिकारी सोलापूर यांनी
२५३ सांगोला विधानसभा मतदार संघाकरिता नियुक्त सर्व क्षेत्रीय अधिकारी, नोडल अधिकारी, पोलीस अधिकारी यांची सभा आज दिनांक २२/०२/२०२४ रोजी पंचायत
समिती सभागृह सांगोला येथे आढावा बैठक घेतली सदर सभेचे सुरुवातीस सर्व उपस्थित अधिकारी यांचे स्वागत करून प्रास्ताविक मा. श्री. संतोष कणसे, अति.
सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार सांगोला यांनी केले व २५३ सांगोला विधानसभा मतदार संघामध्ये एकूण २९९ मतदान केंद्रे असून
आज मितीस १६२११८ पुरुष व १४७१५४ वी ८ इतर असे एकूण ३०९२८२ मतदार आहेत. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी
क्षेत्रीय अधिकारी व पोलीस क्षेत्रीय अधिकारी यांची नेमून दिलेल्या गावामध्ये पहिली संयुक्त भेट झालेली असून त्यावावतचे अहवाल इकडील कार्यालयास प्राप्त झालेले आहेत.
तसेच यापूर्वी सर्व मतदान केंद्रांची AMF सुविधा वावतची तपासणी पर्यवेक्षक व मंडळ अधिकारी यांचेकडून करून घेण्यात आली अमलेबाबत सांगितले.
पुढील मार्गदर्शन मा. श्री. बी.आर. माळी, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मंगळवेढा विभाग मंगळवेढा यांनी केले,
२५३ सांगोला विधानसभा मतदार संघामध्ये एकूण ३४ क्षेत्रीय अधिकारी व ४ राखीव क्षेत्रीय अधिकारी असे एकूण ३८ क्षेत्रीय अधिकारी व ३४ पोलीस क्षेत्रीय अधिकारी यांची नियुक्ती
केली असलेबाबत सांगितले. आचारसंहितेचे पालन होणेसाठी व निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी
स्थिर पथक, भरारी पथक, व्हिडीओ सर्वेक्षण पथक, व्हिडीओ पाहणी पथक, खर्च सनियंत्रण पथक, एक खिडकी कक्ष इत्यादी पथकांचे स्थापना करण्यात आलेली
असून त्यांचे समन्वय अधिकारी म्हणून वर्ग दोन चे अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. विविध निवडणूक कामकाजाचे समन्वय साधणेकामी सदर १७ समन्वय अधिकारी व विविध निवडणूक कामकाजाकरिता
अधिकारी/कर्मचारी यांचे आदेश करणेत आले असले बाबत प्रास्तविका मध्ये सांगितले तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी यांचे तीन प्रशिक्षण झाले असलेबाबत सांगण्यात आले.
मा. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी क्षेत्रीय अधिकारी यांना मार्गदर्शन करत तपासणी केलेल्या मतदान केंद्रावरील सुविधा बाबतचा आढावा घेतला.
क्षेत्रीय अधिकारी सर्व निवडणूक प्रक्रियेचा कणा असून सर्वांनी निवडणूक प्रक्रीयेमध्ये मा. भारत निवडणूक आयोग यांचे मार्गदर्शक सूचनेनुसार काम करावयाचे
असलेबाबत सांगण्यात आले. सर्वांनी जबावदारीने काम करावयाचे असून अडचणी आल्यास संपर्क करणे बाबत सूचना देण्यात आल्या.
सर्व नोडल अधिकारी यांना मार्गदर्शन करताना सर्वांचा कामाबद्दल असलेला पूर्वानुभव व सद्यस्थितीत झालेला बदल यावर चर्चा केली.
१८ ते १९ व २० ते २९ वयोगटातील मतदारांची नोंदणी बाबत सर्वांनी योगदान देणे बावत आवाहन करण्यात आले.
पोलीस अधिकारी यांचेशी कायदा व सुव्यवस्था बाबत चर्चा केली, संवेदनशील केंद्रे व त्यावरील उपाययोजना याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येऊन शांततापूर्ण वातावरणात
निवडणूक प्रक्रिया पार पडेल, याबाबत सूचना देण्यात आल्या सदर बैठकीनंतर मा. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पुण्यश्लोक राजमाता
अहिल्यादेवी होळकर स्मृतीभवन येथील ईव्हीएम सुरक्षा कक्ष, प्रशिक्षण हॉल, मतदान साहित्य वाटप व स्वीकृती केंद्र या ठिकाणी भेट देवून पाहणी केली.



0 Comments