google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कलबुर्गी-कोल्हापूर रेल्वेला सांगोल्यात थांबा मंजूर - चेतनसिंह केदार-सावंत

Breaking News

कलबुर्गी-कोल्हापूर रेल्वेला सांगोल्यात थांबा मंजूर - चेतनसिंह केदार-सावंत

 कलबुर्गी-कोल्हापूर रेल्वेला सांगोल्यात थांबा मंजूर - चेतनसिंह केदार-सावंत


(शब्दरेखा एक्सप्रेस संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (तालुका प्रतिनिधी): प्रवाशांची मागणी लक्षात घेवून खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या पाठपुराव्यामुळे कलबुर्गी - कोल्हापूर रेल्वेला सांगोल्यात थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी दिली.

      याबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत म्हणाले की, कलबुर्गी - कोल्हापूर ही रेल्वे सुरू झाल्यानंतर प्रवाशांची संख्या वाढली होती. मात्र, या रेल्वेला सांगोला रेल्वे स्थानकात थांबा 

नसल्याने सांगोल्यासह आसपासच्या परिसरातील प्रवाशांची गैरसोय होत होती. प्रवाशांची मागणी लक्षात घेवून कलबुर्गी - कोल्हापूर रेल्वेला सांगोला स्थानकात थांबा मिळावा 

यासाठी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता. त्यानंतर खासदार निंबाळकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. 

या पाठपुराव्याला यश आले असून केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी कलबुर्गी - कोल्हापूर रेल्वेला सांगोला रेल्वे स्थानकात थांबा देण्याचे निर्देश रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

रेल्वे मंत्रालयाचे संयुक्त निदर्शक विवेककुमार सिन्हा यांनी  कलबुर्गी - कोल्हापूर रेल्वेला सांगोला रेल्वे स्थानकात थांब्याला मंजुरी दिली असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

 खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या पाठपुराव्यामुळे कलबुर्गी - कोल्हापूर रेल्वेला सांगोल्यात थांबा मंजूर करण्यात आला असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments