google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक ...आधी बोटं तोडली नंतर दगडाने ठेचून मारलं; 28 वर्षीय तरुणाच्या हत्येनं महाराष्ट्र हादरला!

Breaking News

धक्कादायक ...आधी बोटं तोडली नंतर दगडाने ठेचून मारलं; 28 वर्षीय तरुणाच्या हत्येनं महाराष्ट्र हादरला!

धक्कादायक ...आधी बोटं तोडली नंतर दगडाने ठेचून मारलं; 28 वर्षीय तरुणाच्या हत्येनं महाराष्ट्र हादरला!



भाजप नेते आमदार गणपत गायकवाडांनी केलेल्या गोळीबारामुळे उल्हासनगर चर्चेत आलं होतं. त्याच उल्हासनगरमध्ये आता एका २८ वर्षीय तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली.आरोपींनी मयत तरुणाची बोटं कापली आणि दगडाने ठेचून हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

उल्हासनगर येथे 10 जणांनी मिळून एका २८ वर्षीय तरुणाची हत्या केली. आधी तरुणाच्या डोळ्यात मिरची स्प्रे मारला. त्यानंतर त्याची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. 

उल्हासनगरमध्ये हत्या, नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव राहुल जैसवाल असं आहे. तो कुटुंबासोबत उल्हासनगरमधील इमली पाडा भागात राहत होता. 

या घटनेतील मुख्य आरोपी बाबू ऊर्फ पंजाबी मनोहर ढकणी हाही इमली पाडा परिसरातच राहायला आहे. बाबू आणि त्याच्या दोन साथीदारांनी २०२२ मध्ये राहुलची मोटारसायकलला आग लावली होती. 

त्यावेळी राहुल जैसवालने मुख्य आरोपी बाबू ढकणी विरुद्ध सेंट्रल पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. ज्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात बाबू जामिनावर सुटला. 

राहुलच्या हत्येचं कारण काय?

दरम्यान, जामिनावर बाहेर आल्यानंतर बाबू ढकणीने मोटारसायकल जाळल्याची दिलेली तक्रार मागे घेण्याची मागणी केली. पण, राहुलने त्याला नकार दिला. त्यानंतर त्याने त्याच्या दबाव बनवण्याचाही प्रयत्न केला. तरीही नकार दिल्याने बाबू ढकणी, करण ढकणी आणि त्यांच्या इतर चार-पाच साथीदारांनी राहुलच्या घरावर दगडफेक केली. 

बाबू आणि त्याच्या साथीदारांनी राहुलच्या डोळ्यात मिरची स्प्रे फवारला. त्यानंतर त्याची बोटं तोडली. नंतर त्याची दगडाने ठेचून हत्या केली. या घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले होते. दरम्यान, पोलिसांना प्रकरणाची माहिती मिळाली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि सहा आरोपींना अटक केली.

Post a Comment

0 Comments