google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 बाबासाहेब करांडे यांचा खिलारवाडी ग्रामस्थांकडून सत्कार संपन्न

Breaking News

बाबासाहेब करांडे यांचा खिलारवाडी ग्रामस्थांकडून सत्कार संपन्न

बाबासाहेब करांडे यांचा खिलारवाडी ग्रामस्थांकडून सत्कार संपन्न     


     

सांगोला (प्रतिनिधि):  नुकत्याच झालेल्या सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्य शेतकरी कामगार  पक्षाच्या चिटणीस मंडळाचे सदस्य

 व सांगोला शेतकरी सहकारी सूतगिरणीचे विद्यमान संचालक मा.बाबासाहेब करांडे हे भरघोस मताने निवडून आल्याबद्दल खिलारवाडी गावातील सर्वपक्षीय ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. 

प्रमुख उपस्थितीमध्ये महुद जिल्हा परिषद गटाचे युवा नेते देवा गोफने हे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेना नेते व ग्रामपंचायत सदस्य नवल कुमार गाडे यांनी केले. ग्रामस्थांच्या वतीने प्रा. डॉ. दत्तात्रय काळेल यांनी मनोगत व्यक्त केले.

 याप्रसंगी सरपंच शरद हिप्परकर, माजी सरपंच प्रल्हाद खांडेकर, माजी डेप्युटी सरपंच चंद्रकांत बागल, ग्रामपंचायत सदस्य भीमराव खांडेकर, 

तंटामुक्तीचे अध्यक्ष मानाजी खिलारे, सुखदेव खांडेकर बाबुराव नागणे मारुती काळेल, बंडू बागल, विजय बागल, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते बालाजी शिंदे, 

मदन बागल, लोणारी समाज संघटनेचे तालुका उपाध्यक्ष किरण नरळे सल्लागार अजित नरळे, भारत नरळे, शिवाजी खांडेकर, उमाजी खिलारे बाळासो जाधव देवदत्त खांडेकर, सिद्धेश्वर खिलारे, सोमनाथ होळकर, 

आनंद कांबळे, विठ्ठल खांडेकर, समाधान खांडेकर, दीप्तेश काळेल, राजकुमार भादुले इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार शिवसेना नेते व ग्रामपंचायत सदस्य अमर कोळी यांनी मानले.

Post a Comment

0 Comments