google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी..काँग्रेस च्या माळशिरस विधानसभा निरीक्षकपदी अभिषेक कांबळे यांची निवड

Breaking News

मोठी बातमी..काँग्रेस च्या माळशिरस विधानसभा निरीक्षकपदी अभिषेक कांबळे यांची निवड

मोठी बातमी..काँग्रेस च्या माळशिरस विधानसभा निरीक्षकपदी अभिषेक कांबळे यांची निवड


शब्दरेखा एक्सप्रेस संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२

सांगोला (प्रतिनिधी):-येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने इंडिया आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले यांनी

 काल महाराष्ट्रातील २५२ विधानसभा निहाय काँग्रेस पक्ष निरीक्षक नेमण्यात आले.

यामध्ये जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांचे विश्वासू व सांगोला तालुका काँग्रेस चे अध्यक्ष अभिषेक कांबळे यांची माळशिरस विधानसभा निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली.

यावेळी अभिषेक कांबळे यांनी प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले व जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांचे आभार मानले. 

माळशिरस विधानसभा हा राखीव मतदारसंघ असुन माढा लोकसभा मतदारसंघात अत्यंत प्रभाव टाकणारा मतदारसंघ आहे.

 २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघात भाजप उमेदवारास एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळाल्यामुळेच आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला होता.

त्यामुळे या मतदारसंघात अधिक लक्ष देण्याची गरज ओळखून पक्षाने माझी निरीक्षक म्हणून नेमणूक केलीही जबाबदारी अत्यंत 

काळजीपूर्वक पार पाडून माळशिरस विधानसभा मतदारसंघातून इंडिया आघाडीच्या उमेदवारास अधिकचे मताधिक्य मिळवून

 देण्यासाठी माझे नेते डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करणार असल्याचे अभिषेक कांबळे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments