भीषण अपघात..सांगोला शहरात ट्रॅव्हल्स चालकाची ट्रॅक्टरला पाठीमागुन धडक; ऊस तोड मजुराचा मृत्यू
(शब्दरेखा एक्सप्रेस संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी):- अज्ञात ट्रॅव्हल्स चालकाने सत्याचे परीस्थितीकडे दुर्लक्ष करून ट्रॅक्टरला पाठीमागुन ठोकर दिल्याने एक जणांचा मृत्यू झाला असून तिघे जण जखमी झाले असल्याची घटना २४ फेब्रुवारी रोजी
पहाटे अंदाजे ५ वाजणेचे सुमारास सांगोला बायपास रोडवरील हॉटेलसमोर घडली, अपघातामध्ये आबासाहेब उत्तम सावंत (अंदाजे वय ३५ वर्षे, घंटा ऊस तोड मजुर, रा मौजे बविलासुरा, ता आंबड, जि जालना)
यांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची फिर्याद वाल्मीक पांघरे (रा. मौजे वडिलासुरा, ता आंबड, जि जालना) यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.२३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सायंकाळी ७ वा चे सुमारास फिर्यादी मुळ गावी जालना येथे जाण्याकरीता निघाले होते.
दिनांक २४ फेब्रुवारी रोजी पहाटे अंदाजे ५ वाजणेचे सुमाराससांगोला बायपास रोडवरील हॉटलचे काही अंतरावर पुढे आले
असता त्यांचे ट्रॅक्टर व ट्रॉलीला मागुन कोणत्यातरी चाहनाने जोरदार ठोकर दिल्याने ट्रॅक्टर व ट्रॉली रोडचे डिवाडरला धडकून पलटी झाले. त्यावेळी फिर्यादी यांचे सोबत बसलेले
आबासाहेब उत्तम सावंत हे उडुन रोडवर डोक्यावर आपटले, त्यावेळी वाहानास ठोकर मारनाते वाहन पाहीले असता ते नारंगी रंगाची लक्झरी बस होती. सदरची बस ही अपघात करूण पुढे निघुन गेली होती.
मागील येणारी वाहने थांबली व मला, पत्नी, मुलगी यांना अपघातग्रस्त ट्रॅक्टर व ट्रॉलीमधून बाहेर काढुन रोडचे बाजूला बसवले, जमलेल्या लोकांनी फिर्यादी च पत्नी राधा, मुलगी दिपाली व गावातील
आबासाहेब उत्तम सावंत यांना उपचारासाठी सांगोला येथे घेऊण आले होते. तेथे डॉक्टरांनी उपचार केले व आबासाहेब सावंत यास तपासुन मयत असल्याचे सांगितल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
अज्ञात चालकाने त्याने ताब्यातील वाहन हाईगाइने, रास्ताचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहनास पाठीमागुन ठोकर देवून, अपघाताची खबर न देताच पळून गेला असून वाहनावरील अज्ञात चालकाच्या विरुन्द तक्रार दाखल करण्यात आली आहे.
0 Comments