सांगोल्यात इंटरनेट बँकिंग सुविधेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा- डॉ शिवराज भोसले
सांगोला:डॉ आर एन.इंगवले पाटील को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सांगोला या संस्थेचा चौथा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला.
वर्धापन दिनाच्या औचित्य साधून संस्थेने ग्राहकांसाठी इंटरनेट बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
याचा लोकार्पण सोहळा करून संस्थेचे मार्गदर्शक डॉ शिवराज भोसले यांच्या हस्ते इंटरनेट बँकिंग सुविधाचे ॲप लॉन्चिंग करण्यात आले. इंटरनेट बँकिंग सुविधामुळे IMPS ,RTGS, NEFT व इतरही बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे मार्गदर्शक डॉ रमेश इंगवले पाटील, व्हाईट चेअरमन दत्ता टापरे, अस्तित्व संस्थेचे अध्यक्ष शहाजी गडहिरे, अंकुश लिगाडे,
विजयकुमार सूर्यवंशी, दत्तात्रय घाडगे, आप्पासाहेब कोकरे, नंदकुमार सोनलकर, शिवाजी घाडगे, खंडेराव लांडगे, विठ्ठल केदार, सिद्धेश्वर चव्हाण, आप्पासाहेब चव्हाण,
अरुण सुरवसे, संदीप सुरवसे आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विजय इंगवले संजय इंगवले, व्यवस्थापक सचिन शेंडगे, शाखा व्यवस्थापक महेश आलदर, नागेश जाधव यांनी परिश्रम घेतले..
चौकट
ग्राहकांच्या सेवेसाठी तात्काळ पैसे देवाण-घेवाण होण्यासाठी आमच्या संस्थेने इंटरनेट सुविधा चालू केली आहे. याचा ग्राहकांना फायदाच होईल आता यापुढे इंटरनेट बँकिंग सुविधामुळे IMPS, RTGS, NEFT, आपल्या मोबाईल ॲप द्वारे करता येतील
चेअरमन -अजयसिंह इंगवले


0 Comments