google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक घटना...बहिणीला कॉपी पुरवण्यासाठी बनला नकली पोलिस

Breaking News

खळबळजनक घटना...बहिणीला कॉपी पुरवण्यासाठी बनला नकली पोलिस

खळबळजनक घटना...बहिणीला कॉपी पुरवण्यासाठी बनला नकली पोलिस



सोलापूसह अन्य भागात बारावी परीक्षेला सुरुवात झाली आहे. 

या परीक्षेमधील गैरप्रकार टाळ्यासाठी शिक्षण विभागाने विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केली आहे,

 परंतु बारावीच्या पहिल्याच पेपरदरम्यान कॉपी पुरवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

 चक्क परीक्षा केद्रांवर बहिणीला कॉपी द्यायला 'तो' तोतया (नकली) पोलीस बनल्याचा प्रकार घडला आहे. 

अकोला जिल्ह्यातील पातुर शहरातल्या शाहबाबू उर्दू हायस्कूल येथे बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. दरम्यान काल चक्क पोलिसांचा गणवेश

 धारण करून कॉपी पुरविण्यासाठी आलेल्या तोतया पोलिसाचे सल्यूट करतानाच बिंग फुटले आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला.

 अनुपम मदन खंडारे (वय २४, राहणार पांगरा बंदी) असे या तोतया पोलिसाचे नाव आहे.

 दरम्यान अनुपम हा कॉपी पुरवण्यासाठी थेट पोलिसाचा गणवेश परिधान करून नकली पोलीस बनला.

 अनुपम बहिणीला कॉपी देण्यासाठी परीक्षा केंद्रावर इकडे तिकडे फिरू लागला. 

तेवढ्यात पातूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके हे आपल्या ताफ्यासह या परीक्षा सेंटरवर बंदोबस्तासाठी पोहचले. यावेळी त्या ठिकाणी अनुपम हा देखील होता.

पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाहताच अनुपमने त्यांना सल्यूट ठोकला. परंतु पोलिसांना त्याचा सल्यूट पाहून त्याच्यावर संशय आला. 

तसेच त्याने घातलेला गणवेश, त्यावरील नेम प्लेट चुकीची असल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला.

Post a Comment

0 Comments