ऑल इंडिया पँथर सेना महाराष्ट्र राज्य तसेच भिमराज प्रतिष्ठान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून कडून
भिवंडीतील संकेत भोसले हत्याकांडाचा निषेध सर्व आरोपींना फाशी देण्याची मागणी
सांगोला /(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२): भिवंडीतील 16 वर्षीय दलित बालकाचा किडण्याप करून अतिशय निर्घृण पणे मारहाण केली त्यात त्याचा मृत्यू झाला याप्रकरणी सर्व दोषी आरोपीस अद्याप अटक केली नसून एकूण 9 आरोपी याप्रकरणी असून
त्यातील 4 आरोपींना अटक करून 5आरोपी फरार आहेत अद्याप ही त्यांना शोधून काढण्यात पोलिस प्रशासनाला यश नाही त्याबद्दल पोलिसांची संशयास्पद भूमिके बद्दल आमच्या भावना तीव्र असून याप्रकरणी प्रशासनाने दखल घेवून
कोणाच्याही दबावाला बळी न पडता आरोपींना लवकर अटक करावी व त्यांना कठोरात कठोर शिक्षा व मुख्य आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी ही मागणी घेवून निवेदन देण्यात आले
अन्यथा हा समाज येणाऱ्या काळात रस्त्यावर उतरून खूप मोठं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात उभ केलं जाईल अशी भूमिका मंगळवेढा प्रांताधिकारी भैरप्पा माळी साहेब व सांगोला तहसीलदार संतोष कणसे साहेब यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी भिमराज प्रतिष्ठान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अँड.विजय तानाजी बनसोडे, बबलू गुजर, विशाल वाघमारे, रोहित सुर्यागण, संतोष वाघमारे,विष्णू मोहिते,
भीमराव बनसोडे, शीतल खरबडे, विकी साळवे, सुदेश गाडे, सोनू गायकवाड, रोहित चंदनशिवे, रोहित सोनवणे,राज चंदनशिवे, महेश मोरे, प्रशांत कांबळे, मयूर शिंदे,
राहुल चंदनशिवे,युवराज चव्हाण, रोहित कांबळे,अण्णा शिंदे,निलेश गडहिरे,प्रवीण मोहिते,राकेश बनसोडे इ. भिमराज मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते.


0 Comments