google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज...मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील जनावराच्या छावणीच्या बिलासाठी सरकार मुक्याची भूमिका घेतेय.. आ. महादेव जानकर

Breaking News

ब्रेकिंग न्यूज...मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील जनावराच्या छावणीच्या बिलासाठी सरकार मुक्याची भूमिका घेतेय.. आ. महादेव जानकर

 ब्रेकिंग न्यूज...मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील जनावराच्या छावणीच्या बिलासाठी सरकार मुक्याची भूमिका घेतेय.. आ. महादेव जानकर


(शब्दरेखा एक्सप्रेस संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

गतवर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील जनावराच्या छावण्याच्या थकीत बिलाचा प्रश्न उपस्थित करून देखील अद्याप तो प्रश्न मार्गी नसल्याने आज विधिमंडळाच्या 

आज पुन्हा विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या सत्रात महादेव जानकर यांनी छावणीच्या बिलावरून सरकार मुक्याची भूमिका घेत असल्याचा आरोप केला.

गतवर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेमध्ये शेकापचे आ. भाई जयंत पाटील व आ. महादेव जानकर यांनी माण, खटाव, फलटण, 

सांगोला,मंगळवेढा या तालुक्यात दुष्काळात सुरू करण्यात आलेल्या जनावराच्या छावण्याची देयके थकीत असल्याचा मुद्दा लक्षवेध्वारे उपस्थित केला होता.

त्यावेळी मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील छावणी चालकांच्या थकीत 38 कोटी देयकाच्या संदर्भात जे ऑनलाईन ला उपलब्ध आहे. व त्या काळातील रेकॉर्डवर आहे त्याप्रमाणे अनुदान अदा करण्यात येईल.

 तसेच मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीचा निर्णय आल्यानंतर निधी उपलब्ध करण्यात येईल.

असे उत्तर तत्कालीन कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांनी प्रश्नोत्तराच्या सत्रात माजी मंत्री महादेव जानकर व आ. भाई जयंत पाटील यांनी उपस्थितीत केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले होते. 

एक वर्षानंतर देखील छावण्याच्या बिलाचा प्रश्न मार्गी लागला नसल्यामुळे आज पुन्हा प्रश्न उपस्थित करत सरकारवर ताशेरे ओढले.

त्यावेळी शेकापचे जयंत पाटील यांनी ऑनलाईन हजेरी पत्रिकातील बिघाडाचा मुद्दा उपस्थित केला होता.

तर महादेव जानकर यांनी आठवड्यातून एकदा एकाच दिवशी ऑनलाइन हजेरी घेण्याचा नियम असताना अधिकाऱ्याने हा नियम दररोज लावल्याचे सांगितले.

भाजप सरकारच्या काळातील या छावणीची थकीत बिलासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात देखील या छावणीचालकांनी तालुकास्तरावरून ते मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला.

मात्र महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या देयकासाठी तरतूद केली नाही. सत्ता बदलल्यानंतर या छावणी चालकानी

4 जानेवारी 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्यावर छावणी चालकांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार असल्याचा शब्द दिला. 

तर याच प्रश्नावर जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख व तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यातील वादावादी प्रकरणात जनहितचे अध्यक्ष देशमुख यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला.

आ.समाधान आवताडे यांनी देखील मदत पुनर्वसन मंत्र्यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली होती एक वर्षभरानंतर पुन्हा आज 

आ. महादेव जानकर यांनी पुन्हा तोच प्रश्न उपस्थित करत प्रश्न सुटल्या नसल्यावरून सरकारला मुक्याची भूमिका घेत असल्याची उपमा दिली.

Post a Comment

0 Comments