google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक ...पार्किंगच्या वादाला धक्कादायक वळण; आधी मारहाण नंतर फरफटत नेलं, पती-पत्नीनं व्यक्तीला क्रूरपणे संपवलं

Breaking News

खळबळजनक ...पार्किंगच्या वादाला धक्कादायक वळण; आधी मारहाण नंतर फरफटत नेलं, पती-पत्नीनं व्यक्तीला क्रूरपणे संपवलं

 खळबळजनक ...पार्किंगच्या वादाला धक्कादायक वळण; आधी


मारहाण नंतर फरफटत नेलं, पती-पत्नीनं व्यक्तीला क्रूरपणे संपवलं

आठवडा बाजारात उभी असलेली ऑटोरिक्षा बाजूला घेण्यावरून वाद झाला. या वादात आक्रमक झालेल्या पती-पत्नीने एकाला लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यामध्ये युवक गंभीर जखमी झाला. 

यवतमाळ शासकीय रुग्णालयात मंगळवारी रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कळंब पोलिसांनी आरोपी पती-पत्नीला तात्काळ अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कळंब तालुक्यात गोळ्या-बिस्कीट विक्रीचा व्यवसाय करणारा नजमोद्दीन उर्फ देवा निजामोद्दीन देशमुख (४२) रा. इस्लामपुरा कळंब असे मृताचे नाव आहे. तो ई-रिक्षाने गावखेड्यात जाऊन गोळ्या, बिस्कीट विक्रीचा व्यवसाय करत होता.

 मंगळवारी कळंबचा आठवडा बाजार असल्याने तो ई-रिक्षा घेऊन बाजारातील अक्षय मानकर यांच्या दुकानात आला. यावेळी देवाने त्याची ई-रिक्षा बाजूच्या गल्लीत उभी केली होती. 

त्याच दरम्यान आठवडा बाजारात दुकान लावण्यासाठी व्हॅन घेऊन नंदकिशोर थोरात (४७) आणि त्याची पत्नी माया थोरात (४५) हे दोघे पोहोचले.

रस्ता मोकळा नसल्याने त्यांनी देवाला ई-रिक्षा बाजूला करण्यास सांगितले. देवाने माल घेतला आहे. लगेच निघतो, दोन मिनिटे वेळ द्या, असे म्हटले. 

यावरून थोरात दाम्पत्याने शिवीगाळ करत वाद घालणे सुरू केले. या वादात चवताळलेल्या दाम्पत्याने हातात लोखंडी रॉड घेऊन देवावर हल्ला चढविला.

 हा वाद सुरू असताना तो सोडविण्यासाठी पवन पचकटे हा युवक मध्ये गेला त्याच्यावरही लोखंडी रॉडने वार केले. गर्दी जमल्यानंतर थोरात दापत्यांनी व्हॅन घेऊन पळण्याचा प्रयत्न केला केला.

यावेळी व्हॅनमध्ये बसलेल्या माया थोरात हिने देवाची मान पकडून त्याला फरफटत नेले. काही अंतरावर नेऊन देवाला फेकून दिले. यात देवा गंभीर जखमी झाला. तातडीने त्याला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. 

मात्र, तेथे त्याचा रात्री उशिरा मृत्यू झाला. या प्रकरणी मृताचा भाऊ नसिमोद्दीन करिमोद्दीन देशमुख याच्या तक्रारीवरून नंदकिशोर बाबाराव थोरात, माया थोरात दोघे रा. गांधीनगर यवतमाळ यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

कळंब ठाणेदार दीपमाला भेंडे, उपनिरीक्षक अभय चवथनकर यांनी तातडीने रात्रीच दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. आज न्यायालयात हजर करून कोठडीची मागणी केली.

Post a Comment

0 Comments